परदेशी विद्यार्थ्यांनी पुण्यात अनुभवला ‘रमजान ईद ‘ चा गोडवा !

Date:

‘आझम कॅम्पस ‘ चा पुढाकार ,१२०० विद्यार्थ्यांना गुलाबपुष्पे  ,अत्तर आणि मिठाईचे वाटप  
पुणे :दूरदेशातून   शिक्षणासाठी पुण्यात आलेल्या  विविध महाविद्यालयातील परदेशी विद्यार्थ्यांनी आज (मंगळवारी ) सकाळी एकत्रितपणे रमझान ईद चा गोडवा अनुभवला ! डॉ पी ए इनामदार यांच्या अध्यक्षतेखाली आझम कॅम्पस परिवाराने पुढाकार घेऊन १२०० विद्यार्थ्यांना गुलाबपुष्पे ,अत्तर आणि मिठाई देऊन ईद साजरी केली . यात विद्यार्थीनींचाही समावेश होता .
आखाती आणि अरबी देशात चंद्रदर्शन झाल्याने तेथील रीतीप्रमाणे पुण्यातील परदेशी विद्यार्थी ईद साजरी करतात . तिकडे हे चंद्रदर्शन आज झाल्याने पुण्यातही परदेशी विद्यार्थ्यांनी  आजच ईद साजरी केली .
आझम कॅम्पस मध्ये या विद्यार्थ्यांना खास निमंत्रित करण्यात आले आणि प्रेमाने मिठाई देण्यात आली . रमजान चे महिनाभराचे उपवास सोडण्याचा सोहळा म्हणजे रमझान ईद (ईद -उल -फित्र )! त्यानिमित्त आज सकाळी आझम कॅम्पस (पुणे कॅम्प ) मधील मशिदीत या पुणेस्थित  परदेशी विद्यार्थ्यांनी एकत्रित नमाजपठण केले . एकमेकांची प्रेमभरी गळाभेट घेतली  रमझान ईदच्या शुभेच्छांची देवाणघेवाण केली  आणि   एकमेकांची वास्तपुस्त केली .  पुण्यात एकत्रित ईद साजरी करायला मिळाल्याची आनंदवार्ता आपल्या कुटुंबियांना परदेशात सोशल मीडियावरून लगेच कळवली !
आझम कॅम्पस परिवाराच्या वतीने या विद्यार्थ्यांना गुलाबपुष्पे ,अत्तर आणि मिठाई देण्यात आली . महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ पी ए इनामदार  ,आझम कॅम्पस चे विश्वस्त ,पदाधिकारी यावेळी उपस्थित होते . या उपक्रमाचे हे दुसरे वर्ष होते .
‘रमझान ईद हा आनंदसोहळा असल्याने त्यात पुण्यात राहणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांनाही आम्ही सामावून घेतले . घरापासून दूर असल्याची भावना प्रत्येक परदेशी विद्यार्थ्यांच्या मनात असते . एकत्रित ईद साजरी केल्याने त्यांच्या आनंदात भर पडते . पुण्याची सर्वसमावेशक आणि प्रेमळ संस्कृती दूरदेशापर्यंत जाऊन पोहोचते ,हाच या उपक्रमामागचा उद्देश आहे ‘,असे डॉ पी ए इनामदार यांनी यावेळी सांगितले .
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

येरवडा कारागृहात 5 मोबाईल,2 पॉवर बँक,चार्जिंग वायर सापडली..

पुणे- येथील येरवडा मध्यवर्ती कारागृहात पुन्हा एकदा सुरक्षेचा प्रश्न...

माझी गाणी आजही रसिकांच्या पसंतीत -सिनेगीतकार समीर अंजान

'एमआयटी एडीटी' विद्यापीठाच्या 'पर्सोना महोत्सवा'ची उत्साहात सांगता लोणी-काळभोर (पुणे)...

अंतरकचेरी व्हॉलीबॉल स्पर्धेत सलग दहा वर्षे विजेतेपदाची परंपरा कायम!

पिंपरी चिंचवड महापालिकेचा दणदणीत विजयपिंपरी : पुणे आंतर कचेरी...