युवकांनी राजकारणातही यशस्वी व्हावे : डॉ. सप्तर्षी
पुणे :’युवक क्रांती दल ‘आयॊजीत ‘युवक आणि राजकारण ‘ या विषयावरील कार्यशाळेला शनिवारी चांगला प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्र गांधी स्मारक निधी ( गांधीभवन ) कोथरूड येथे शनिवार, ११ मे २०१९ रोजी ही एक दिवसीय कार्यशाळा झाली .
सकाळी १० ते सायं ४ पर्यंत विविध वक्त्यांनी मार्गदर्शन केले .
पहिल्या सत्रात संदीप बर्वे,जांबुवंत मनोहर,अप्पा अनारसे, फिरोज मुल्ला यांनी युवा भान,ग्रामीण भागाची सध्याची परिस्थिती आणि राजकारण ‘या विषयांवर प्रभावी मांडणी केली. ‘माझा वैचारिक प्रवास ‘ या विषयावर मनोगत व्यक्त केले
दुसऱ्या सत्रात ‘युवक क्रांती दलाचे ‘ संस्थापक डॉ.कुमार सप्तर्षी यांनी ‘राजकारणाचा अर्थ समजुन घेताना’ या विषयवार सविस्तर मार्गदर्शन केले .ते म्हणाले ,’
डॉ. कुमार सप्तर्षी यांनी जागतिक इतिहासातील क्रांतीचा मागोवा घेतला. तरुण पिढीला क्रांती चे आकर्षण असते. पण, सर्जनशीलता दाबून , विचार दाबून संघटना, जाती, पक्ष चालवल्या जातात. माणसा- माणसातील अंतर कमी करणे हीच आजच्या काळात क्रांती होय.जातींमुळे माणसामाणसात अंतर निर्माण झाले. ते कमी करुन जातीमुक्त झाले पाहिजे.
लोकशाही मान्य केल्यावर राजकारण हे जीवनात अंतिम, अपरिहार्य आहे. त्यापासून फटकून राहता येणार नाही.
आता क्रांती केवळ राजकीय मार्गानेच शक्य आहे.युक्रांद कार्यकर्त्यांनी केवळ सामाजिक कामात समाधान न मानता राजकारणात यशस्वी व्हावे, अशी अपेक्षा डॉ. सप्तर्षी यांनी व्यक्त केली. दूरगामी ध्येय्य ठेवून काम केले पाहिजे, कारण एका -दोन पिढीत क्रांती होत नाही.जनशक्तीलाच बरोबर क्रांती करता येईल, मात्र, लौकिक कायम ठेवणारे राजकारण आपण केले पाहिजे, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला .
सुदर्शन चखाले, लहू आरेकर,महेश पाटील यांनी संयोजन केले