नृत्यातील पुण्याचे काम देशभर पोहोचण्यासाठी संस्थात्मक काम गरजेचे : शमा भाटे

Date:

पुणे ः‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ‘कथक मधील नृत्य संरचनांचा प्रवास'(कोरिओग्राफी -काल,आज ,उद्या)या विषयावर ज्येष्ठ नृत्य गुरु  शमा भाटे  यांच्या मुलाखतीला आज (शुक्रवारी )चांगला प्रतिसाद मिळाला.
‘शास्त्रीय नृत्य संवर्धन संस्था’ यांनी हा कार्यक्रम सादर केला .शमा भाटे यांची मुलाखत जयश्री बोकील आणि लीना केतकर यांनी घेतली. दि. २६एप्रिल, शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता ‘भारतीय विद्या भवना’चे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह, सेनापती बापट रस्ता येथे हा कार्यक्रम झाला. ‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत   हा ७५वा कार्यक्रम होता.
शमा भाटे म्हणाल्या, ‘कोरियोग्राफी हे पाश्चात्त्य तंत्र आहे.उदय शंकर यांनी हे क्षेत्र भारतीयांसाठी खुले केले.तेव्हा कोरियाग्राफी शब्द नव्हता, बॅले शब्द होता.आपल्या नृत्यशैलींचे पुनरूत्थान व्हावे, यासाठी त्या काळातील गुरु प्रयत्नशील होते.डान्स डिरेक्टर ते कोरियोग्राफर असा शब्दाचा प्रवास आहे. नृत्य संरचना असेही त्या काळात कोणी म्हणत नव्हते.
नृत्य क्षेत्रातील पुण्याचे नाव देशभर व्हावे, यासाठी आम्ही संस्थात्मक काम सुरू केले आहे.नृत्य हे एका वर्गासाठी मर्यादित नाही. ते सर्वांसाठी आहे. सर्वांना ते आवडते.पुण्यात भरतनाट्यम, कथक प्रचलित होते. कुचीपुडी, अरंगेत्रम तितके प्रचलित नव्हते.
पौराणिक रचनांपासून भारतात नृत्य संरचनांना सुरवात झाली, भारतीय रचनांचे पुनरुत्थान करावे, असे तेव्हा भारतीय गुरुंना वाटत होते. नंतर सामाजिक रचनाही भारतीय नृत्यात येत गेल्या. आता डान्स  स्क्रिप्टही लिहिली जाते.
‘ आपण ज्या नृत्यशैलीत वर्षानुवर्षे वावरतो, त्याच शैलीचा विचार मन करीत असते. कथकच्या बाबतीत माझे तसेच झाले आहे. माझे मन कथक झाले आहे.
नृत्यरचनांना त्यातील सांस्कृतिक आशयाप्रमाणे संगीत देण्याचा प्रयत्न मी करते.पूर्वी नेटवर संगीतरचना शोधता येत नसत. आता ती सुविधा आहे.
संगीत हे केवळ नृत्याची पार्श्वभूमी तयार करीत नाही, तर ते नृत्याचा विचार घेऊन येते. संगीत ह्रदयापर्यंत पोहोचले पाहिजे.
लय _ ताल  विचार हा नृत्य संरचना करताना महत्वाचा असतो. गुरुंकडून तेही आम्ही शिकलो, असेही शमा भाटे यांनी या मुलाखतीदरम्यान सांगितले. वाचन ही महत्वाचे असते. आणि डोळयांनी पाहणेही नृत्याला उपयोगी ठरते, असेही शमा भाटे यांनी या मुलाखतीदरम्यान सांगितले.‘भारतीय विद्या भवन’चे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी प्रास्ताविक केले.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मुंबई महापालिकेचे बजेट 80,952 कोटींचे,पण तब्बल 36 हजार कोटींच्या ठेवी वापरणार….

मुंबईकरांसाठी या अर्थसंकल्पात एक महत्त्वाची बाब समोर आली आहे....

बदलत्या काळानुसार पत्रकारांनी तंत्रस्नेही होणे गरजेचे – प्रा. सुशोभन पाटणकर

ए आय तंत्रज्ञानाद्वारे मिळालेल्या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी शहानिशा आवश्यक पिंपरी,...

मुंबई प्रमाणे पुण्यातही 500 चौ. फूट घराला मिळकत कर शून्य करा- स्थायी च्या पहिल्या बैठकीत कॉँग्रेस चा प्रस्ताव

ऐतिहासिक निर्णयाबाबतचा चेंडू आता अध्यक्ष श्रीनाथ भिमालेंच्या मैदानात.. प्रशासनाचा...

सोलर एनर्जी प्रकल्प वापरणाऱ्यांना मिळकत करात 10 टक्के सवलत द्या – दुधाने आणि मानकर यांचा प्रस्ताव

पुणे-सोलर एनर्जी प्रकल्प, म्हणजेच सूर्यप्रकाशाद्वारे वीज निर्मिती करण्याचा प्रकल्प...