‘संगत संगोष्ठी’ :कथक नृत्य ,साथसंगत यावरील सप्रयोग चर्चासत्र उत्साहात

Date:

पुणे ः‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत संगत संगोष्ठी’  या कथक नृत्य,साथसंगत या विषयावर संगत संगोष्ठी’या  सप्रयोग चर्चासत्रचे आयोजन २५ एप्रिल २०१९ रोजी करण्यात आले होते .त्याला चांगला प्रतिसाद मिळाला .

शास्त्रीय नृत्य संवर्धन संस्था आणि नृत्यवेध कथक नृत्य संस्था यांनी  हा कार्यक्रम सादर केला . दि. २५ एप्रिल, शुक्रवारी सायंकाळी  वाजता ‘भारतीय विद्या भवना’चे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह, सेनापती बापट रस्ता  येथे हा कार्यक्रम झाला .

  निखिल फाटक,डॉ.चैतन्य कुंटे,सुनील अवचट,चिन्मय कोल्हटकर,मृण्मयी फाटक,आमोद कुलकर्णी,डॉ.माधुरी आपटे   हे कलाकार या कार्यक्रमात  सहभागी झाले . ‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत  सादर झालेला हा ७४ वा कार्यक्रम होता .

डॉ चैतन्य कुंटे चर्चा सत्रात बोलताना म्हणाले ” नर्तकाला नृत्यातून जे सांगायचे त्याला पूरक अशीच संगीताची आणि साथसंगत करणार्यांची भूमिका असावी , अन्यथा संगीत नर्तकाच्या नृत्यावर वर्चस्व गाजवू  शकते”

डॉ कुंटे पुढे म्हणाले,”नृत्य पुढे आले पाहिजे आणि संगीताने दुय्यम भूमिका घ्यावी. कोणत्याही देवतेची वंदना सादर करताना त्या इश्वराचे स्वरूप लक्षात घेऊन त्यानुसार रागांची, स्वरांची निवड वंदनेसाठी निवडावे लागते. शिववंदनेचे संगीत कृष्ण वंदनेला चालणार नाही. ‘


चिन्मय कोल्हटकर म्हणाले,'” नृत्याची साथसंगत करताना नृत्य प्रकार समजला पाहिजे, प्रत्यक्ष कार्यक्रमापूर्वी होमवर्क महत्वपूर्ण असून नर्तकाच्या पदन्यासाप्रमाणे ,लयीनुसार  संगीत दिले गेले पाहिजे, नोटैशन स्वतः  साथ करणार्याने काढल्या पाहिजेत”  .

कार्यक्रमाला  मनिषा साठे,शमा भाटे ,शर्वरी जमेनीस इ मान्यवर उपस्थित होते.मनिषा साठे यांची शिष्य वल्लरी आपटे यांनी तसेच डॉ. माधुरी आपटे यांनीही कथक सादर केले. डॉ माधुरी आपटे  या कार्यक्रम सूत्रधार होत्या . ‘भारतीय विद्या भवन’चे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी प्रास्ताविक केले .

निखिल फाटक(तबला),चारूदत्त फडके( गायन),आमोद कुलकर्णी,मृण्मयी फाटक(संवादिनी),कुंटे,कोल्हटकर(बासरी ),सुनिल अवचट  यांनी साथसंगत केली .

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मी खोटं एफआयआर केल्याचे सिद्ध झाले तर मला जेल मध्ये टाका.. रोहित पवार आक्रमक

VSR आणि विमान वाहतूक मंत्र्याचे लागेबांधे बारामती - मी...

व्हीएसआर कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यास नकार:रोहित पवार आक्रमक; कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी

बारामती- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार...

व्हीएसआर कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी रोहित-युगेंद्र पवार मैदानात:बारामती पोलिस ठाण्यात दाखल; समर्थकांची गर्दी

बारामती- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार...

दिल्ली पोलिसांवर हिमाचलमध्ये गुन्हा दाखल,हिमाचल पोलीस म्हणाले,इकडे मनमानी नाही चालणार,नाकेबंदी करून थांबवले

शिमला-हिमाचल प्रदेशमध्ये दिल्ली पोलिसांवर बुधवारी एफआयआर (FIR) दाखल करण्यात...