केटरिंग क्षेत्रातील प्रश्न सोडविण्यासाठी संघटित व्हा:सरपोतदार

Date:

पुणे :’केटरिंग क्षेत्रातील सरकार दरबारपासून सर्व प्रकारच्या समस्या सोडविण्यासाठी आणि एकत्रितरित्या प्रगतीच्या संधी शोधण्यासाठी आउटडोअर केटरिंग क्षेत्रातील सर्वानी संघटित होण्याची आवश्यकता आहे ‘असे प्रतिपादन महाराष्ट्र केटरिंग असोसिएशनचे अध्यक्ष किशोर सरपोतदार यांनी केले.
‘न्यू पुणे केटरिंग असोसिएशन ‘चा महामेळावा  पुण्यात १५ एप्रिल रोजी सायंकाळी साडेसहा वाजता हॉटेल ताज विवांता (ब्लू डायमंड ) येथे झाला .‘महाराष्ट्र केटरिंग असोसिएशन’चे अध्यक्ष किशोर सरपोतदार हे मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी होते ,उपाध्यक्ष जी.एस.बिंद्रा हे पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी‘न्यू पुणे केटरिंग असोसिएशन ‘अध्यक्ष मन्साराम माळी ,उपाध्यक्ष बाबूसिंह पुरोहित,उपाध्यक्ष बाबुलाल गौड,सनी अवसरमल ,मनोज वैष्णव,एम.क्यू सईद,दिनेश्वर नाथानी ,सुहास आदमाने उपस्थित होते.
किशोर सरपोतदार म्हणाले,’भारतभरातून ४ पिढ्या केटरिंग क्षेत्रात व्यवसाय करायला पुण्यात आल्या आहेत.हा व्यवसाय आव्हानात्मक होत आहे.ग्राहकांच्या आवडी ,निवडी ,गरजा ,बजेट बदलत आहेत ,सरकारी नियम बदलत आहेत.अशावेळी संघटित होऊन प्रश्न सोडविणे आणि संघटितपणे प्रगतीच्या संधी शोधणे आवश्यक आहे.
‘सणासुदीलाही दुसऱ्याना सेवा देणाऱ्या केटरर्स मंडळींनी आरोग्य जपावे,स्वतःसाठी वेळ काढावा’,असे आवाहनही त्यांनी केले.
जी.एस.बिंद्रा यांनी’संघटनशक्तीचे फायदे’या विषयावर मार्गदर्शन केले. या महामेळाव्यात केटरिंग क्षेत्रातील करियरसाठी ,जीएसटी विषयक उपयुक्त ठरणारी दोन व्याख्यानेही झाली.एस.आर.भार्गव यांनी जीएसटी कर प्रणालीची माहिती दिली ,तर दिनेश्वर नाथानी यांनी प्रेरक व्याख्यान दिले.ऑल इंडिया हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीचे अध्यक्ष सनी अवसरमल यांनी केटरिंग असोसिएशनसाठी आवश्यक विमा योजनांविषयी माहिती दिली.
संयोजन समितीच्या वतीने मन्साराम माळी,बाबूसिंह पुरोहित,बाबुलाल गौड,काळुराम गेहलोत ,दलपतसिंह पुरोहित ,मनोज वैष्णव यांनी स्वागत केले.महेश सोनी यांनी सूत्रसंचालन केले. अन्नपूर्णा माता प्रतिमेच्या पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
पुणे जिल्ह्यातील केटरिंग क्षेत्रातील व्यावसायिकांनी  (आउट डोअर ) एका छत्राखाली यावे,या उद्देशाने हा महामेळावा घेण्यात आला. जीएसटी कर प्रणालीतील प्रश्न ,एफडीए चे नियम समजावून सांगणे ,सरकारदरबारी व्यावसायिकांच्या समस्या मांडणे,समाजात या व्यवसायाला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी नवनवे उपक्रम आयोजित करणे ,यासाठी ही असोसिएशन उपक्रम आयोजित करणार आहे,असे यावेळी संयोजकांनी सांगितले. न्यू पूना केटरिंग असोसिएशच्या व्या कार्यकारिणीची घोषणा  मनोज वैष्णव यांनी केली
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मुंबई प्रमाणे पुण्यातही 500 चौ. फू . घराला मिळकत कर शून्य करा- स्थायी च्या पहिल्या बैठकीत कॉँग्रेस चा प्रस्ताव

ऐतिहासिक निर्णयाबाबतचा चेंडू आता अध्यक्ष श्रीनाथ भिमालेंच्या मैदानात...

सोलर एनर्जी प्रकल्प वापरणाऱ्यांना मिळकत करात 10 टक्के सवलत द्या – दुधाने आणि मानकर यांचा प्रस्ताव

पुणे-सोलर एनर्जी प्रकल्प, म्हणजेच सूर्यप्रकाशाद्वारे वीज निर्मिती करण्याचा प्रकल्प...

प्रदूषणाने कॅन्सर; महाराष्ट्र सरकारची कबुली, 57% रुग्णांचे फुफ्फुस ‘आजारी’, राज्य सरकारच्या अभ्यासात मोठा खुलासा

बांधकामांच्या ठिकाणचे धुळीचे लोट रोखण्यासाठी मोहीम ही देवेंद्र फडणविसांची...