पुणे :
जागतिक ह्रदय दिनानिमित्त मंगेशकर हॉस्पिटल तर्फे ‘हेल्दी हार्ट क्लब’ सदस्य आणि ‘डॉक्टर्स इलेव्हन’ यांच्यात क्रिकेट मॅच घेण्यात आली. ‘व्हीजन क्रिकेट ग्राऊंड’ (वडगाव फ्लायओव्हर जवळ, सिंहगड रस्ता) येथे आज (शुक्रवारी) झालेल्या क्रिकेट मॅचमध्ये ‘हेल्दी हार्ट क्लब’ सदस्यांचा संघ विजयी झाला. फिटनेस राखणाऱ्या ह्रदय रुग्णांचा सत्कार क्रिकेटपटू मिलिंद गुंजाळ यांच्या हस्ते करण्यात आला.
हृदयरोगाबाबत जनजागृतीसाठी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या सभागृहात जाहीर कार्यक्रम घेण्यात आला. हृदयरोग शस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख डॉ. शिरीष साठे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी
हृदयरोग आणि हृदय शल्यचिकित्सा विभागाचे तज्ञ डॉक्टर
उपस्थित होते.
मार्गदर्शन करताना डॉ. साठे म्हणाले, ‘जागतिक हृदयदिनानिमित्त हृदयरोगाबाबत जनजागृती करणे हा या क्रिकेट स्पर्धेचा प्रमुख हेतू होता. तंबाखु सेवन, अतिमद्यपान, व्यायामाचा अभाव, आहाराचा अनियमितपणा या गोष्टी टाळल्या तर 85 % लोकांमध्ये हृदयरोगामुळे होणारे मृत्यूचे प्रमाण टाळता येऊ शकते. त्यामुळे याबाबत जनजागृती करणे हा या उपक्रमाचा उद्देश होता.
यावेळी जागतिक हृदयदिनानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील रुग्णांचा विशेष सत्कार
मिलिंद गुंजाळ यांच्या
हस्ते करण्यात आला. यामध्ये तीन महिन्यामध्ये कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण ठेवणे, वजनावरील नियंत्रण आणि मधुमेहावरील नियंत्रण या स्पर्धांचा समावेश होता.
’कार्डियाक रिहॅब’च्या टीम ने या उपक्रमासाठी विशेष मेहनत घेतली.
डॉ. शिरीष साठे यांनी कार्यक्रमाचे
सूत्रसंचालन आणि
प्रास्ताविक केले
तर डॉ. आफताब यांनी आभार मानले.
याप्रसंगी खेळाडूंच्या फिटनेसचे किस्से मिलिंद गुंजाळ यांनी सांगितले. ते म्हणाले ‘कपील देव यांचा सुरूवातीचा व्यायाम, ५
ते ७
किलोमीटर पळणे,
भरपूर
दूध पिणे असा असायचा. गावसकर यांचा डाएट कंट्रोल, फीटनेस अजूनही चांगला आहे.
जलतरणपटू अमर आढाव १६ वेळा सिंहगड चढला, लिमका रेकॉर्ड केले. खेळाडूंनी मनाने खंबीर
असणे महत्वाचे असते.’
खेळाडूंच्या जेवण्याच्या, व्यायामाच्या वेळा ठरलेल्या असतात. त्या कसोशीने पाळतात
,
असेही त्यांनी सांगितले
ते पुढे म्हणाले, ‘खेळातून प्रेरणा आणि ताकद मिळते. माझ्या वडिलांनी एकही आजारपणाची रजा घेतली नाही. मीही एकही वैद्यकीय बिल कंपनीकडे पाठविले नाही. ‘खेळून आनंदी रहा, फिट रहा ‘ हा संदेश चांगल्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरेल. ‘