पुणे : ईगल एज्युकेशन सोसायटीच्या ‘ युनिक इंग्लिश मिडियम स्कूल’ कात्रज, येथे ‘विज्ञान आनंद मेळावा आणि विज्ञान प्रदर्शन ‘ नुकतेच आयोजित करण्यात आले होते . प्रदर्शनाचे उद्घाटन ईगल एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. आर.ए.मुलाणी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी संस्थेचे पदाधिकारी डॉ.शरद इनामदार , एड . तारिक अन्वर पटेल , शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. जयश्री जाधव , उपमुख्याध्यापिका सौ. चांदगुडे शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
राष्ट्रीय विज्ञानदिनानिमित्त आयोजित या प्रदर्शनात इ.१ली ते इ.११वी च्या विद्यार्थांनी विज्ञान, भूगोल, गणित, इतिहास व कला या विषयावर विविध प्रकल्प तयार केले.प्रदर्शनात स्वयंचलित पथदिवे, जलशोधक पथ, सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प, धुरशोषक यंत्र, सौरउर्जेवर चालणारा पंप, मूत्रपिंडाची प्रतीकृती हे प्रकल्प लक्षवेधक ठरले. प्रदर्शनाला भेट देणाऱ्या विज्ञानप्रेमींसाठी व पालकवर्गासाठी इ. ११वी च्या विद्यार्थ्यांनी आनंदमेळाव्याचे आयोजन केले होते. त्यालाही पालकांनी चांगला प्रतिसाद दिला .

