पुणे :भारती अभिमत विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट (आयएमईडी ) आयोजित ‘ डॉ . पतंगराव कदम राष्ट्रीय वक्तृत्व स्पर्धेत ‘ ऋषिकेश पखाले ,किरण कीर्तिकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला . निकिता पाटील , उद्देश कृष्णा पवार यांना द्वितीय तर अंजली रावत ,सागर यांना तृतीय क्रमांक मिळाला . वैभव मेहता ,अलिशा मेमन यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले .
आयएमईडी चे संचालक आणि भारती विद्यापीठाच्या व्यवस्थापनशास्त्र शाखेचे अधिष्ठाता डॉ . सचिन वेर्णेकर यांनी ही माहिती दिली .
भारती अभिमत विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट (आयएमईडी )तर्फे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी डॉ . पतंगराव कदम राष्ट्रीय वक्तृत्व स्पर्धेचे २२ फेब्रुवारी रोजी आयोजन करण्यात आले होते . आयएमईडी च्या पौड रस्ता येथील कॅम्पस मध्ये ही स्पर्धा झाली .
डॉ . पतंगराव कदम -एक द्रष्टा नेता ,भारताचे अर्थशास्त्र :समस्या आणि उपाय ,धर्म आणि राजकारण ,बेरोजगारीचा राक्षस ,स्वच्छतेतून विकास ,भारतीय शिक्षण पद्धतीसमोरील आव्हाने व उपाय असे विषय या वक्तृत्व स्पर्धेसाठी होते . प्रथम क्रमांक विजेत्याला दहा हजार रोख ,द्वितीय क्रमांकासाठी ७ हजार ,तृतीय क्रमांकासाठी ५ हजार अशी पारितोषिके ,सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र डॉ . सचिन वेर्णेकर यांच्या हस्ते देण्यात आली .