हुतात्मा राजगुरुंना राजगुरुनगरमध्ये नमन !
पुणे :
भीमा नदीच्या उगमापासून (भीमाशंकर) ते विजापूर अशी ‘नमामि चंद्रभागा- जल साक्षरता यात्रेस प्रारंभ झाला. दिनांक ७ ते १४ ऑगस्ट २०१७ या कालावधीत काढण्यात आलेल्या यात्रेदरम्यान हुतात्मा राजगुरू यांना राजगुरूनगर येथे नमन करण्यात आले. उगमस्थानी पूजा करुन यात्रेला आशीर्वाद घेतला. तसेच भीमाशंकर जंगलातील झाडांना राख्या बांधण्यात आल्या.
जल बिरादरीचे अध्यक्ष डॉ. राजेंद सिह म्हणाले, ‘माझ्या आणि वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या चर्चेतून जलसाक्षरता केंदाची कल्पना पुढे आली. आणि ती पूर्ण झाली. ‘
भीमाशंकर येथे डॉ. राजेंद्रसिंह यांनी उपस्थितांना सह्याद्री पर्वत हिरवागार ठेवण्याची, भीमा नदी स्वच्छ ठेवण्याची शपथ दिली. तहसिलदार सुनील जोशी, वनाधिकारी स्वाती जमदाडे, नरेंद चुघ, जलबिरादरीचे राज्य संघटक सुनील जोशी, संजय यादवराव, ‘जलबिरादरी’चे पुणे शहर व जिल्हाध्यक्ष विनोद बोधनकर, सुहास पटवर्धन उपस्थित होते. ‘नमामी चंद्रभागा ‘ पुस्तिकाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले.