पुणे :ज्येष्ठ अभ्यासक आणि गुरु घसिदास विद्यापीठ ( विलासपूर ) चे कुलपती डॉ . अशोक मोडक संशोधित ‘ रशियाला समजलेले स्वामी विवेकानंद ‘ या विषयावरील शोध निबंध पुस्तिकेचे प्रकाशन शनिवारी ,१९ जानेवारी रोजी झाले .’संशोधन -ज्ञान -विचार प्रतिष्ठान ‘च्या ‘डॉ . श्रीपती शास्त्री रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस ‘ तर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .
हा प्रकाशन कार्यक्रम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र -कुलगुरू डॉ . एन . एस . उमराणी यांच्या हस्ते गरवारे कॉमर्स कॉलेज च्या सावरकर सभागृहात , शनिवारी १९ जानेवारी रोजी ,सकाळी ११ वाजता झाला.
डॉ . उमराणी म्हणाले ,’स्वामीजींच्या विचारांचे आंतरराष्ट्रीय पडसाद पुढे आणणारा हा शोध निबंध महत्वाचा ऐतिहासिक दस्तावेज आहे . त्याच्या भाषांतरासाठी पुणे विद्यापीठ निधी उपलब्ध करून देईल . भौतिकवादाचा भस्मासूर फोफावत असताना भारतीय विचार जगात महत्वाचा ठरणार आहे . ‘डॉ अशोक मोडक म्हणाले ,’रशियात सध्या मांडणी होत असलेला राष्ट्रवाद आणि भारतातील सांस्कृतिक राष्ट्रवाद यात नाते आहे . स्वामी विवेकानंद यांच्या विचारांची मोहिनी टॉल्स्टॉय आणि अनेक रशियन प्राच्यविद्या अभ्यासकांवर होती .स्वामी विवेकानंद हे समाजवादी होते ,अशी मांडणी भारतात आणि भारताबाहेर केली जाते ,ती निराधार आणि विकृत आहे . ‘पुणे विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ . मंगेश कुलकर्णी ,डॉ शरद खरे, डॉ. शरद देशपांडे,इत्यादी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते .’संशोधन -ज्ञान -विचार प्रतिष्ठान ‘चे अध्यक्ष नितीन देशपांडे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. राजश्री देशपांडे यांनी आभार मानले.