नृत्य नाटिकेतून घडले स्त्री संतांच्या कार्याचे दर्शन !
पुणे :भारतीय विद्या भवन -इन्फोसिस फाऊंडेशन च्या सांस्कृतिक प्रसार उपक्रमांतर्गत ‘भारतीय कला केंद्र ‘ प्रस्तुत ‘ समर्पण ‘ या भरतनाट्यम नृत्य नाटिकेला पुणेकर रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
सरदार नातू सभागृह ,भारतीय विद्या भवन ,सेनापती बापट रस्ता येथे हा कार्यक्रम शुक्रवारी ,१८ जानेवारी रोजी सायंकाळी झाला. भारतीय विद्या भवन चे मानद सचिव नंदकुमार काकिर्डे यांनी प्रास्ताविक केले.
संत कान्होपात्रा ,संत मुक्ताई ,संत जनाबाई या ३ स्त्री संतांची कार्याची रूपे मांडणारा हा आगळा वेगळा कार्यक्रम होता. मूळ संकल्पना अश्विनी एकबोटे यांची तर लेखन अनघा काकडे यांचे होते . तिन्ही संतांच्या जीवनकार्याची कथा अभंगाच्या पार्श्वभूमीवर नृत्याच्या पार्श्वभूमीवर उलगडत गेली .
नृत्य दिग्दर्शन अनघा हरकरे , संगीत स्मिता महाजन यांचे होते . अनुश्री केतकर ,श्रिया एकबोटे ,प्रज्ञा कदम ,बिलंदी कुलकर्णी ,भार्गवी अत्रे ,श्रद्धा पवळे ,आदी सहभागी झाले
भारतीय विद्या भवन -इन्फोसिस फाऊंडेशन च्या सांस्कृतिक प्रसार उपक्रमातील हा ६७ वा कार्यक्रम होता.