रंगूनवाला डेंटल कॉलेजतर्फे मुख कर्करोग आणि हेल्मेट वापराविषयी जनजागृती मोहिम
‘असोसिएशन ऑफ ओरल अँड मॅक्सीऑफिशियल सर्जन्स ऑफ इंडिया ‘च्या सुवर्णमहोत्सवास पुण्यात प्रारंभ
पुणे :‘असोसिएशन ऑफ ओरल अँड मॅक्सीऑफिशियल सर्जन्स ऑफ इंडिया ‘च्या सुवर्णमहोत्सवानिमित्त महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्यूकेशन सोसायटीच्या रंगूनवाला डेंटल कॉलेज आयोजित मुख कर्करोग आणि हेल्मेट वापराविषयी जनजागृती मोहिमेचे ,मशाल पदयात्रेचे उद्घाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमळकर यांनी आज केले.
हा कार्यक्रम एम ए रंगूनवाला डेंटल कॉलेज, आझम कॅम्पस येथे झाला. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.पी. ए. इनामदार होते.
‘असोसिएशन ऑफ ओरल अँड मॅक्सीऑफिशियल सर्जन्स ऑफ इंडिया ‘च्या सुवर्णमहोत्सवानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता . ओरल अँड मॅक्सीलोफेशियल सर्जरी विभागाचे प्रमुख डॉ जे बी गारडे यांनी कुलगुरूंना रंगूनवाला डेंटल हॉस्पिटल मध्ये सुरु असलेल्या मुख कर्करोग विषयक संशोधनाची आणि हेल्मेट नसल्याने झालेल्या अपघातग्रस्तांवर केलेल्या शस्त्रक्रियांची माहिती दिली .
डॉ . करमाळकर म्हणाले ,’रंगूनवाला डेंटल हॉस्पिटल मध्ये सुरु असलेल्या मुख कर्करोग विषयक संशोधनाला आंतरराष्ट्रीय सहयोग मिळावा ,यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रयत्न करेल ‘
यावेळी लतीफ मगदूम ,प्राचार्य रमणदीप दुग्गल ,डॉ हर्षद भागवत ,डॉ सोनी ,डॉ गौरव खुटवड , डॉ . अश्विनी वडणे उपस्थित होते .
मुख कर्करोग विषयक जनजागृतीसाठी कॉलेज च्या विद्यार्थ्यांनी ‘ये पान हमे इस मोड पे ले आया ‘ हे पथनाट्य सादर केले . कुलगुरूंनी त्याचे कौतुक केले .
रंगूनवाला डेंटल कॉलेज तर्फे १० जानेवारी रोजी मुख कर्करोग विषयक आणि हेल्मेट वापरविषयक जनजागृतीसाठी मशाल पदयात्रा आझम कॅम्पस ,सेव्हन लव्हज चौक मार्गे भारती विद्यापीठ डेंटल कॉलेज पर्यंत काढण्यात येणार आहे