प्रसुतीसाठी आलेल्या स्त्रियांना तुपाच्या बरण्या आणि घरचे जेवण देणाऱ्या डॉक्टरची ‘माझी गोष्ट ‘प्रकाशित

Date:

पुणे :’वैद्यकीय व्यवसाय हा आज व्यवसाय न राहता धंदा बनला आहे ,आणि तरीही प्रामाणिक ,मार्गदर्शक डॉक्टर या व्यवसायात आहेत ,या प्रामाणिक वैद्यकीय व्यावसायिकात डॉ . लीला गोखले (रानडे ) यांचे स्थान अतिशय वरचे आहे ‘ असे गौरवोद्गार ज्येष्ठ लेखक किरण नगरकर यांनी काढले .
पुण्यातील जुन्या पिढीतील शतायुषी स्त्री -रोग तज्ज्ञ डॉ. लीला गोखले (रानडे )यांच्या ‘ माझी गोष्ट ‘ या  आत्मकथनाचे  आणि ई -बुकचे प्रकाशन  ज्येष्ठ लेखक किरण नगरकर  यांच्या हस्ते झाले.
डॉ. गोखले या १०१ वर्ष वयाच्या आहेत. मौज प्रकाशन गृह यांच्या वतीने , ज्येष्ठ लेखक किरण नगरकर , तसेच ज्येष्ठ वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. सुभाष काळे यांच्या हस्ते हे आत्मकथन प्रकाशित झाले.नॅशनल फिल्म अर्काईव्हज सभागृह येथे हा कार्यक्रम ३ जानेवारी सायंकाळी ६ वाजता झाला.
यावेळी किरण नगरकर प्रमुख पाहुणे या नात्याने  बोलत होते .
नगरकर म्हणाले ,’एक स्त्री आणि एक डॉक्टर किती मोठे  काम करू शकते याचे दर्शन डॉ लीला गोखले यांच्या पुस्तकातून होते . आजच्या वैद्यकीय विद्यार्थ्यांना हे पुस्तक वस्तुपाठ म्हणून उपयोगी ठरेल . सुविधा असलेल्या प्रतिकूल काळात गोखले यांच्या पिढीने अत्यंत चिकाटीने आणि प्रामाणिकपणे हा व्यवसाय केला . वैद्यकीय व्यवसाय हा आज व्यवसाय न राहता धंदा बनला आहे ,आणि तरीही प्रामाणिक ,मार्गदर्शक डॉक्टर या व्यवसायात अपवादात्मक  आहेत . या प्रामाणिक ,अपवादात्मक वैद्यकीय व्यावसायिकात डॉ . लीला गोखले (रानडे ) यांचे स्थान अतिशय वरचे आहे .एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकाचे प्रतिबिंब या आत्मकथनात पडले आहे .  ‘
डॉ सुभाष काळे म्हणाले ,’आरोग्य या विषयाकडे शासनाचे प्रथमपासून दुर्लक्ष आहे . वाढत्या लोकसंख्येच्या भयानक धोक्याबाबत  कोणताही पक्ष बोलत नाही ,मतदारही त्यांना याबाबत प्रश्न विचारत नाहीत . अशा पार्श्वभूमीवर डॉ लीला गोखले यांनी  जुन्या काळात केलेले कुटुंबनियोजनाचे काम आणि स्पष्ट विचार महत्वपूर्ण ठरतात . त्यांच्या मेडिकल रेकॉर्ड ठेवण्याची पद्धती  आजच्या काळात पाहायला मिळणे दुरापास्त झाले आहे . कोणाचेही दडपण न मानता ,मिळकतीकडे लक्ष न देता रुग्णसेवा केली . प्रसूतीसाठी आलेल्या स्त्री रुग्णांना घरचे जेवण आणि तुपाच्या बरण्या देणाऱ्या डॉ लीला गोखले आज दंतकथाच वाटतील . ‘
मोनिका गजेंद्रगडकर यांनीही मनोगत व्यक्त केले .
यावेळी ‘ मौज ‘ प्रकाशनचे संजय भागवत, श्रीकांत भागवत, मोनिका गजेंद्रगडकर, अतुल गोखले, अनिता बेनिंजर- गोखले , ज्येष्ठ दिग्दर्शिका सई परांजपे उपस्थित होत्या.आत्मकथन मौज प्रकाशनाने प्रकाशित केले आहे ,तर इ -बुक ‘बुकगंगा ‘ ने प्रकाशित केले आहे . इ -बुक चे प्रकाशनही आजच्या कार्य्रक्रमात झाले . अतुल गोखले यांनी सूत्रसंचालन केले . 
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

माणिकराव कोकाटेंची मंत्रिपदावरून हकालपट्टी:मुख्यमंत्र्यांच्या शिफारसीला राज्यपालांची मंजुरी

मुंबई-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माणिकराव कोकाटे यांचे क्रीडा खाते...

घरातच केली हायड्रोपोनिक गांजा ची लागवड -साडेतीन कोटीचा गांजा जप्त

पुणे : ३१ डिसेंबर च्या पार्ट्यांचे आयोजने सुरु असताना...

“आयुष्यावर बोलू काही” आणि बावधन-कोथरूड भूषण पुरस्कार सोहळा गुरुवारी

पुणे: राष्ट्रसेवा प्रतिष्ठानच्या वतीने सलील कुलकर्णी, शुभंकर कुलकर्णी आणि...

‘मनसे’शी युती म्हणजे उबाठा गटाचा अस्तित्व वाचवण्याचा शेवटचा प्रयत्न

भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांची प्रखर टीकामुंबई-उबाठा...