कौशल्ये प्रशिक्षणानंतर महिला स्वतःचा ब्रँड निर्माण करू शकतात : डॉ. हर्षा जोशी

Date:

पुणे :’नव्याने निर्माण होणाऱ्या सेवा आणि रोजगार संधी  बाहेरच्यांच्या हाती देण्यापेक्षा स्थानिक ग्रामीण महिलांनी कौशल्ये प्रशिक्षणाद्वारे आत्मविश्वासपूर्वक हस्तगत कराव्यात ‘ असे आवाहन ‘अनुभूती ‘ संस्थेच्या संचालक हर्षा जोशी यांनी केले .
‘सिनर्जी फाउंडेशन ‘ आणि ‘अनुभूती सोशल एम्पॉवरमेंट एन्ड एज्युकेशनल फाउंडेशन ‘ संस्थेतर्फे सोमवारी पुणे जिल्ह्यातील ग्रामीण महिलांसाठी
‘महिला सक्षमीकरण आणि स्वयंरोजगार मेळावा ‘ आयोजित करण्यात आले होते  . हा मेळावा कॅस्युरीना हॉल ,कुरुंजी (ता . भोर ) येथे  सोमवार,१० डिसेंबर रोजी ,सकाळी ११ ते २ या वेळेत झाला .   ‘सिनर्जी फाउंडेशन ‘ चे राजेंद्र आवटे,मंदार देवगावकर , ‘अनुभूती ‘ संस्थेच्या डॉ . हर्षा  जोशी ,माधुरी सुमंत ,स्मिता तळेले ,हर्षा रास्ते ,मिलिंद जोरी ,प्रशांत कोल्हे यांनी मार्गदर्शन केले . सरपंच अस्मिता गायकवाड ,ग्रामपंचायत सदस्य छाया मळेकर यावेळी उपस्थित होत्या
यावेळी बोलताना हर्षा जोशी यांनी सद्यस्थिती आणि महिलांना उपलब्ध कौशल्य विकास पर्यायांबद्दल मार्गदर्शन केले . त्या म्हणाल्या ,’ महिलांना चांगले प्रशिक्षण मिळाले ,तर त्या स्वतःचा ब्रँड निर्माण करू शकतात . त्यांच्यातील आत्मविश्वास जागृत करण्याची गरज आहे . उत्तम प्रशिक्षणानेच हे काम होऊ शकते. त्यासाठी मार्केटिंग ची मदत अनुभूती आणि सिनर्जी तर्फे करण्यात येईल  ‘
सिनर्जी फाउंडेशन ‘ चे राजेंद्र आवटे म्हणाले ,’ डोंगरी भागातील रिसॉर्ट आणि पर्यटन उद्योग पूर्णपणे महिला चालवू शकतात . आदरातिथ्य -हॉस्पिटॅलिटी उद्योगात अत्यंत चांगल्या संधी आता उपलब्ध आहेत . पूर्णपणे महिलांनी चालवलेली रिसॉर्ट आता पुढे येत आहेत ,अशा वेळी चांगली कौशल्ये शिकणे ही उद्योगाची पहिली महत्वाची पायरी ठरू शकते .
पर्यटन ,सेंद्रिय शेती ,बागकाम ,खाद्यपदार्थ बनवणे ,हस्तकला -शिवणकला ,संगणक -मोबाईल दुरुस्ती या विषयांवर तज्ज्ञांनी प्रशिक्षण दिले . ग्रामीण भागातील ९० महिला प्रशिक्षणाला उपस्थित होत्या . या महिलांचे विषयनिहाय विशेष  प्रशिक्षण पुढील महिन्यात आयोजित करण्यात येणार आहे
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

विजय पांढरे म्हणाले- भाजपच्या घोटाळ्यावर बोलल्यानंतर अजितदादांचा विमान अपघात, कोर्टावरचाही विश्वास उडाला

मुंबई-उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील अकाली निधनाने संपूर्ण...

मुंबई/पुणे- मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर 32 तासांनंतर वाहतूक सुरळीत

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर सुमारे 31 तासांनंतर गुरुवारी सकाळी वाहतूक कोंडी...

महाराष्ट्र साहित्य परिषद निवडणुकीसाठी साहित्य संवर्धन आघाडीचे विशेष सॉफ्टवेअर विकसित

पुणे —महाराष्ट्र साहित्य परिषद निवडणूक जाहीर झाली असून साहित्य...