दिनांक ४ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता ‘शेती आणि मेक इन इंडिया’ विषयावर कार्यशाळा : वक्ते विजय जावंधिया (शेतकरी आंदोलनातील कार्यकर्ते , वक्ते आणि लेखक) आणि मिलिंद मुरुगकर (अर्थतज्ञ आणि विश्लेशक ), सायंकाळी ६ वाजता अमरेंद्र धनेश्वर यांचे भक्ती आणि सुफी संगीटाचे आयोजन. गुरुवार ५ ऑक्टोबर रोजी ‘आंतरराष्ट्रीय राजकारण व दशहतवादाचे स्वरूप’ विषयावर कार्यशाळा -वक्ते लक्ष्मीकांत देशमुख (लेखक आणि निवृत्त प्रशासकीय अधिकारी), सायंकाळी ६ वाजता काव्यांजली कार्यक्रमात कोजागिरीनिमित्त ‘त्रिभाषिक मुशायरा’ -कवी प्रदीप निफाडकर, साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित कवी नझीर फतेहपुरी,
‘महाराष्ट्र गांधी स्मारक निधी’ तर्फे ८ व्या वर्षी ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी’ सप्ताहाचे आयोजन
दिनांक २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीदिनी ‘शांतीमार्च’चे आयोजन
पुणे : महाराष्ट्र गांधी स्मारक निधी तर्फे सलग ८ व्या वर्षी ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी’ सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहाचे यंदाचे ८ वे वर्ष आहे. दिनांक १ ते ८ ऑक्टोबर २०१७ या कालावधीमध्ये होणाऱ्या या सप्ताहाचे उदघाटन प्रा. डॉ. गणेश देवी (प्रवर्तक : दक्षिणायन सांस्कृतिक चळवळ), यांच्या हस्ते १ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. कुमार सप्तर्षी (अध्यक्ष : महाराष्ट्र गांधी स्मारक निधी) असतील, अशी माहिती गांधी सप्ताहाच्या संयोजकांनी दिली.
या वर्षीचा गांधी सप्ताह ‘महाराष्ट्र गांधी स्मारक निधी’,
गांधीभवन, कोथरूड, पुणे येथे होणार आहे. सप्ताहाबद्दल माहिती देताना डॉ. कुमार सप्तर्षी म्हणाले , ‘महात्मा गांधींजींची विचारसरणी, त्यांच्या चारित्र्याचा प्रभाव नेमका कसा होता हे नव्या पिढीला सांगणे आजही अत्यावश्यक आहे. त्या विचारांचे स्मरण करण्याच्या निमित्ताने महात्मा गांधी सप्ताहात गांधी भवनात विविधांगी कार्यक्रम होत आहेत. गांधी सप्ताहादरम्यान गांधी जयंती (दिनांक 2 ऑक्टोबर) हा दिवस ‘जागतिक अहिंसा दिन’ म्हणून पाळला जातो. या निमित्ताने ‘महाराष्ट्र गांधी स्मारक निधी’तर्फे ‘शांती मार्च’चे आयोजन करण्यात येते. हा ‘शांती मार्च’ सकाळी 9 वाजता आयोजित करण्यात आला आहे. ‘शांती मार्च’ चा मार्ग सेनापती बापट पुतळा, अलका चौक, कुमठेकर रोड, बाजीराव रोड, सीटि पोस्ट मार्गे शनिवार वाडा असा असून, शनिवार वाडा येथे समारोप सभा होईल.’
सप्ताह कालावधीत खादी, हातमाग व इतर गृहोपयोगी वस्तूंचे प्रदर्शन सकाळी ११ ते रात्री ९ वाजेपर्यंत ‘महाराष्ट्र गांधी स्मारक निधी’, गांधीभवन, कोथरूड, पुणे येथे सर्वांसाठी खुले राहणार आहे.
राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताहा बाबत संस्थेचे सचिव अन्वर राजन आणि संयोजक संंदीप बर्वे यांनी माहिती दिली.
रविवार, दिनांक १ ऑक्टोबर रोजी
दुपारी ३वाजता प्रा. डॉ. गणेश देवी (भाषातज्ञ् आणि दक्षिणायन चळवळीचे प्रवर्तक) यांच्याशी चर्चा, सायंकाळी ५ वाजता
सर्वधर्म प्रार्थना आणि सप्ताहाचे उदघाटन डॉ. देवी यांच्या हस्ते होणार आहे.
सोमवार दिनांक २ ऑक्टोबर रोजी सकाळी ८. ३० वाजता शुभांगी मुळे व सहकारी यांचे प्रार्थना व भजन, सकाळी ९ वाजता (सेनापती बापट पुतळा, अलका टॉकीज ते शनिवारवाडा) मार्गे शांती मार्च चे आयोजन, सायंकाळी ४ वाजता ‘महात्मा’ (जीवनपट ) दाखविला जाणार आहे.
मंगळवार दिनांक ३ ऑक्टोबर रोजी शिक्षणतज्ञ अनिल सद्गोपाल यांच्याशी खुला संवाद, दुपारी २ ते ५ ‘कापूस कोंड्याची गोष्ट’ चित्रपट , सायंकाळी ५ वाजता सद्गोपाल यांचे ‘शिक्षणक्षेत्रातील समस्या व उपाय’ या विषयावर सद्गोपाल यांचे
व्याख्यान होईल.
सहकारी यांचा सहभाग आहे. शुक्रवार दिनांक ६ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता राज कुलकर्णी (पंडीत नेहरूंचे अभ्यासक) यांच्याबरोबर चर्चा, सायंकाळी ६ वाजता ‘आधुनिक भारताचे निर्माते’ विषयावर कुलकर्णी यांचे व्याख्यान होईल. शनिवार दिनांक ७ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता जिग्नेश मेवाणी (दलितांतवर होणार्या हल्ल्यांविरुद्ध लढणारे तरुण नेते, गुजरात), विश्लेषक तुषार गांधी (गांधीजींचे पणतू) आणि सामाजिक कार्यकर्ते प्रा. मिलिंद आव्हाड (जेएनयू, दिल्ली) यांच्याशी चर्चा, सायंकाळी ६ वाजता ‘जाती का सवाल और वर्तमान दलित राजनीती’ विषयावर
या वक्त्यांच्या समारोपानिमित्त परिसंवादाचे आयोजन
रविवार दिनांक ८ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ ते २ ‘लघुपट निर्मिती’ कार्यशाळा : मार्गदर्शक अशोक राणे (समीक्षक लेखक आणि दिग्दर्शक), दुपारी ३. ३० वा. ‘रोड टू संगम’ चित्रपट, दुपारी ४ वा जादूगार संजय रघुवीर यांचे जादूचे प्रयोग. असे अनेक कार्यक्रम या सप्ताहात होतील.