मार्टीन ल्यूथर किंग, नेल्सन मंडेला यांच्या तैलचित्रांचे अनावरण !
पुणे :
‘महाराष्ट्र गांधी स्मारक निधी’ (गांधी भवन) कोथरूड येथे सभागृहात मार्टीन ल्यूथर किंग, नेल्सन मंडेला यांची भव्य तैलचित्रे लावण्यात आली आहेत. चित्रकार शैलेश वेदपाठक यांनी ही तैलचित्रे तयार केली आहेत. गांधी सप्ताहानिमित्त त्यांचे अनावरण नुकतेच करण्यात आले. पत्रकार निखिल वागळे यांच्या हस्ते शैलेश वेदपाठक यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी ‘महाराष्ट्र गांधी स्मारक निधी’चे अध्यक्ष डॉ.कुमार सप्तर्षी, सचिव अन्वर राजन, विश्वस्त अभय छाजेड, युवा क्रांती दलाचे सचिव संदीप बर्वे, डॉ. उर्मिला सप्तर्षी, युक्रांद शहराध्यक्ष मयुरी शिंदे, अप्पा अनारसे आदी मान्यवर उपस्थित होते
‘महात्मा गांधी यांच्यापासून प्रेरणा घेऊन जागतिक पातळीवर मानवतेचे लढे लढणाऱ्या मार्टिन ल्यूथर किंग,नेल्सन मंडेला यांची भव्य तैलचित्रे शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंतीनिमित्त सभागृहात लावण्याचा निर्णय घेण्यात आला’, असे महाराष्ट्र गांधी स्मारक निधी चे अध्यक्ष डॉ.कुमार सप्तर्षी यांनी सांगितले.
मार्टिन ल्युथर किंग या नेत्याने अमेरिका तील काळा -गोरा वर्ण द्वेष संपवण्यासाठी आयुष्य वेचले, त्यांनी महत्मा गांधीना आपले मार्गदर्शक मानले. दक्षिण अफ्रिकेत वर्णद्वेषी सरकारा विरोधात लढणारे नेल्सन मंडेला यानी महत्मा गांधी पासून प्रेरणा घेतली असल्याचे त्यांनी आपल्या लिखणात नमूद केलेले आहे. अन्याया विरोधात लढणारे जगातील अनेकाना महात्मा गांधी प्रेरणा दायी ठरले आहेत ‘ असे अन्वर राजन यांनी यावेळी सांगीतले.