पुणे :‘माय अर्थ फाऊंडेशन’, ‘सिंहगड युवा फाऊंडेशन’आणि ‘शिवोदय मित्र मंडळ’ यांच्या संयुक्तविद्यमाने पर्यावरण पूरक गणेशोत्सवाचा संदेश देणार्या सायकल रॅलीला रविवारी चांगला प्रतिसाद मिळाला .
रविवार, दिनांक 9 सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता या रॅलीस मित्रमंडळ पर्यावरण शिल्प येथून प्रारंभ झाला .
श्री गणेश वेशात पर्यावरण संदेश देणाऱ्या युवकाने रॅलीचे नेतृत्व केले . प्लास्टिक व थर्माकोल मुक्त गणेशोत्सव, पर्यावरण रक्षण, नदी-ओढे -नाले संरक्षण ,निर्माल्य- मुक्त, प्रदूषण मुक्त असा गणेशोत्सव साजरा करू असे संदेश रॅलीमध्ये देण्यात आले . पर्यावरणप्रेमी नागरिक नितीन कदम यांच्या हस्ते प्रारंभ झाला .
अनंत घरत (अध्यक्ष, ‘माय अर्थ फाऊंडेशन’) , दिनेश भिलारे ,मनीष जगदाळे तसेच सुमारे शंभर युवक या सायकल रॅलीत सहभागी झाले .
मित्र मंडळ चौकातील पर्यावरण शिल्प येथून रॅलीस प्रारंभ होऊन पुढे सारसबाग, विजयानगर, अलका टॉकीज मार्गे शनिवारवाड्यास फेरी मारून कसबा गणपती येथे सांगता झाली