पुणे :ईद-उल -झुआ निमित्त पुण्यातील परदेशी मुस्लिम विद्यार्थ्यांना
शुभेच्छा कार्यक्रमास मंगळवारी चांगला प्रतिसाद मिळाला . हाजी गुलाम महंमद आझम एज्युकेशन ट्रस्ट ने या उपक्रमाचे आझम कॅम्पस (पुणे कॅम्प )येथे आयोजन केले होते . ट्रस्ट चे अध्यक्ष डॉ . पी . ए . इनामदार यांच्या हस्ते या विद्यार्थ्यांना चॉकलेट ,गुलाबपुष्प ,अत्तर भेट देण्यात आले . यावेळी ‘अवामी महाज ‘सामाजिक संघटनेचे सचिव वाहिद बियाबानी ,नासिर खान ,मुफ्ती कासमी,कुरेशी इत्यादी मान्यवर उपस्थित होते .अरब आणि आखातासह अनेक देशांचे पुण्यात शिकणारे सुमारे एक हजार विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले . आझम कॅम्पस मशिदीत ईद चा नमाज पढण्यात आला
ईद निमित्त पुण्यातील परदेशी मुस्लिम विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्याचा कार्यक्रमास प्रतिसाद
Date:

