पुणे ः
‘बी.बी.ए. -बीझनेस प्रोसेस सर्व्हिसेस’ आणि ‘बी. कॉम. -बीझनेस प्रोसेस सर्व्हिसेस’ या अभ्यासक्रमांसाठी ‘टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेस’ आणि भारती विद्यापीठाच्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड आंत्रप्रुनरशीप डेव्हलपमेंट’ (आयएमईडी) मध्ये परस्पर सहकार्य करार झाला आहे.
‘टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेस’चे सरव्यवस्थापक जी. बालनारायण आणि आयएमईडीचे संचालक सचिन वेर्णेकर यांनी या करारावर सह्या केल्या.
‘उद्योगजगत आणि व्यवस्थापनशास्त्र शिक्षण जगताला अधिक जवळ आणण्याच्या दृष्टीने हे अभ्यासक्रम महत्त्वाचे ठरणार आहेत,’ असे डॉ. सचिन वेर्णेकर यांनी सांगितले.
‘व्यवस्थापनशास्त्र विद्यार्थ्यांना औद्योगिक तंत्र आणि मंत्र शिकण्यासाठी टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेस’ ने पुढाकार घेतला आहे, असे जी. बालनारायण यांनी सांगितले.
‘ट्रेन द ट्रेनर’ प्रोग्राम हे बीझनेस प्रोसेस सर्व्हिसेस (बी. पी. एस.) कोर्सेसचे वैशिष्ट्ये आहे. भावी काळातील उद्योगजगाला लागणार्या विषयांची जोड या अभ्यासक्रमात दिली आहे.

