कन्याकुमारी-लेह सायकल मोहिमेचे पुण्यात आगमन
सायकलस्वार प्रा . वासंती जोशी यांचा लायन्स क्लब औंध -पाषाण तर्फे सत्कार
पुणे :’भीतीवर मात करा ‘ असा महिलांसाठी संदेश देत कन्याकुमारी ते लेह मार्गावर निघालेल्या सायकल मोहिमेचे आज पुण्यात आगमन झाले . लायन्स क्लब ऑफ पुणे औंध -पाषाण च्या वतीने मंगळवारी रात्री मोहिमेचे स्वागत करण्यात आले आणि सायकलस्वार प्रा . वासंती जोशी यांचा सत्कार करण्यात आला .
प्रा . वासंती जोशी यांच्यासमवेत त्यांच्या चमूतील शुभदा जोशी ,केतकी जोशी ,गायत्री फडणीस यांचाही सत्कार करण्यात आला .
लायन्स क्लब चे प्रांतपाल रमेश शहा ,लायन्स क्लब ऑफ पुणे औंध -पाषाण चे अध्यक्ष डॉ सतीश देसाई ,एड . सतीश धोका यांच्याहस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले . यावेळी मोहिमेसाठी आर्थिक मदतीचा धनादेश देण्यात आला .
ग्राहकपेठेचे कार्यकारी संचालक सूर्यकांत पाठक ,काका धर्मावत ,प्रदीप बर्गे यावेळी उपस्थित होते . हा स्वागत कार्यक्रम मंगळवारी रात्री गिरिकंद ट्रॅव्हेल्स च्या कार्यालयात करण्यात झाला .
२८ मे ते ५ जुलै अशी ही मोहीम असून ‘ येस वुई कॅन :काँकरिंग नोन अँड अननोन फिअर ‘ असा या मोहिमेचा संदेश आहे . दररोज किमान १५० किलोमीटर सायकलिंग केले जात असून या मोहिमेची लिम्का बुक रेकॉर्ड्स ‘ मध्ये नोंद होणार आहे . कन्याकुमारी ते लेह मोहिमेचे हे अंतर ४२७५ किलोमीटर आहे .
प्रा . वासंती जोशी या एस एन डी टी विद्यापीठ पुण्यात अकाउंट्स विषयाच्या प्राध्यापक आहेत . महर्षी कर्वेंनी स्थापन केलेल्या संस्थांचा ५
जुलै रोजी स्थापना दिन असून त्यांनी महिलांप्रती केलेल्या योगदानाला मानवंदना म्हणून या मोहिमेचा समारोप ५ जुलै रोजी होणार आहे .
लेह मधील उमलिंग खिंड ला जाणाऱ्या त्या पहिल्या सायकलस्वार ठरणार असून ही खिंड १९ हजार ३०० फूट उंचावर आहे .
प्रा . वासंती जोशी या बुधवारी ६ जून रोजी एस एन डी टी विद्यापीठ कर्वे रस्ता येथे सायंकाळी ४ ते ५ वेळात पुणेकरांना भेटणार आहेत ,असे यावेळी गिरिकंद ट्रॅव्हल्स च्या संचालक शुभदा जोशी यांनी सांगितले .