राजकारण अळवावरचे पाणी ,समाजकारण कायम टिकणारे :गिरीश बापट ,’लायन्स क्लब पुणे औंध – पाषाण’ च्या अध्यक्षपदी डॉ. सतीश देसाई

Date:

पुणे :
‘लायन्स क्लब ने समाजात सेवावृत्ती रुजविली आहे ,पुढील काळात युवा नेतृत्वघडणाची जबाबदारी लायन्स ने घ्यावी असे आवाहन पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले . राजकारण हे अळवावरचे पाणी असते ,पान हलले कि पाण्याचे थेम्ब पटापट पडतात ,समाजकारणच चिरकाल टिकणारे असल्याने  हा देश राजकारण्यांमुळे चालत नसून समाजकारण्यांमुळे चालतो ‘असे ही ते म्हणाले .
‘लायन्स क्लब पुणे औंध – पाषाण’ च्या अध्यक्षपदी डॉ. सतीश देसाई यांच्या आणि कार्यकारिणीतील सदस्यांच्या शपथविधी कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी सायंकाळी घोले रस्त्यावरील नेहरू सांस्कृतिक भवन येथे  करण्यात आले  होते . यावेळी प्रमुख पाहुणे या  नात्याने गिरीश बापट बोलत होते .
लायन्सचे माजी आंतरराष्ट्रीय संचालक नरेंद्र भंडारी अध्यक्षस्थानी होते .  उपप्रांतपाल रमेश शाह ,मावळते अध्यक्ष डॉ प्रदीप दामले ,सचिव गणेश जाधव ,प्रदीप बर्गे ,गिरीश मालपाणी आदी व्यासपीठावर उपस्थित होते .
गिरीश बापट म्हणाले ,’माणसातील मनुष्यत्व उभे करून दुसऱ्याला मदत करण्याची भावना ,संस्कार निर्माण करणे हे लायन्स चे यश आहे . लायन्स चे हे कार्य समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचविण्याची गरज आहे . युवा पिढीला मार्गदर्शनाची गरज असून लायन्स या पिढीतील नेतृत्व गुण शोधून त्यांना पुढील काळाचे नेतृत्व करण्यासाठी घडवावे ‘
राजकारण हे अळवावरचे पाणी असते ,पान हलले कि पाण्याचे थेम्ब पटापट पडतात ,म्हणून हा देश राजकारण्यांमुळे चालत नसून समाजकारण्यांमुळे चालतो. समाजकारण हेच चिरकाल टिकते . राजकारणात निवडणुकीपूर्वी जोरात काम होते आणि निवडणुकीनंतर संपते . ‘
डॉ . सतीश देसाई या मित्रासाठी या पदग्रहण समारंभाला मी आलो .देसाई हे कल्पक नेतृत्व असून स्वतः काम करत करत दुसऱ्यांना कामाला लावण्याची कला त्यांच्याकडे आहे . असेही ते म्हणाले
लायन मदनभाई सुरा यांच्या स्मरणार्थ ‘लायनभूषण ‘ पुरस्कार सुरु केला जाणार असल्याची माहिती डॉ सतीश देसाई यांनी यावेळी दिली . लायन्स च्या नव्या शतकाची सुरुवात विविधअंगी समाजकार्याने केली जाणार आहे ,असेही त्यांनी सांगितले .
सुधीर गाडगीळ यांनी सूत्रसंचालन केले .
दिलीप शेठ यांनी आभार मानले .
सभागृहात यावेळी विनोद शाह ,कृष्णकांत कुदळे ,अंकुश काकडे ,अरुण शेवते ,प्रकाश देवळे ,मिलिंद जोशी ,रवी चौधरी ,सुरेश धर्मावत ,सचिन इटकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते .
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुणे शहराची भविष्यातील गरज लक्षात घेऊन पुरंदर विमानतळाची निर्मिती करण्यात येणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुरंदर विमानतळ विकास कामांचा आढावा मुंबई, दि....

‘ओव्या आजीच्या’, ‘शालेय रंगभूमीसाठी नाटिका’ पुस्तकांचे प्रकाशन

पुणे : सुलभा रारावीकर लिखित ‘शालेय रंगभूमीसाठी नाटिका’ आणि...

संगीतातून ईश्वर दर्शन-पद्म विभूषण उस्ताद अमजद अली खान यांचे विचार

एमआयटी डब्ल्यूपीयूतर्फे  प्रा. डॉ. श्रीवर्धनी के. झा, खासदार ज्योथिमणी...

भारत रशियाकडून तेल खरेदी करणे थांबवेल असे रशियाला वाटत नाही:ट्रंपवर विश्वास नाही

ट्रम्प यांचा दावा- भारत रशियन तेल खरेदी करणे थांबवेल मॉस्को-रशियाने...