पुणे ः ‘इनोसंट टाईम्स चाईल्ड केअर‘ या प्री-स्कूल एज्युकेशन-चाईल्ड केअर सेंटरचे उद्घाटन बालविकास तज्ज्ञ डॉ. अर्चना कदम यांच्या हस्तेरोजी झाले.
जागतिक ऑटिझम महिन्याचे औचित्य साधून गतीमंद, ऑटिझम झालेल्या आणि अध्ययनात गती कमी असणार्या बालकांसाठी हे सेंटर सुरू करण्यात आले आहे. सकाळनगर, बाणेर रस्ता येथे हे सेंटरचे उद्घाटन पार पडले.
या सेंटरला डॉ. चंचल आगरवाल, डॉ. संयोगिता नाडकर्णी, डॉ. अंकीता संघवी यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. ‘गतीमंद, ऑटीझम झालेल्या आणि अध्ययनात कमी असणार्या बालकांना लहानपणापासून सेंटरमध्ये मार्गदर्शन मानसोपचार मिळाले की त्यांच्या बुद्धयांक वाढतो, संवाद वाढतो आणि भाषेची समज वाढते. बाणेर भागातील हे पहिलेच प्री स्कूल चाईल्ड केअर सेंटर आहे,‘ अशी माहिती डॉ. अंकिता संघवी यांनी दिली.
या बालकांसाठी विशेष खेळ, उपकरणे खेळणी सेंटरमध्ये उपलब्ध करण्यात आली आहेत. त्यात ‘बोलस्टर‘, स्विंग, प्लॅटफॉर्म, स्विंग, क्लायंबिंग लॅडर, रोप, टायर, स्विंग, टनेल, सॅण्ड पीट, साऊंड वॉल, वॉटर झोन, बॉल पूल एरिया यांचा समावेश आहे.
ऑक्युपेशल थेरपी स्पीच, लँग्वेज पॅथॉलॉजी, प्ले थेरपी, रिनिडिएशन, अॅक्वा थेरपी, क्लिनिकल अॅसेसमेंट या तंत्रांचाही सेंटरमध्ये समावेश करण्यात आला आहे.

