पुणे :मोडक राममंदिर ( शिवतीर्थनगर, कोथरुड ) येथे रामनवमी निमित्त रामजन्मसोहळा साजरा करण्यात आला . महिलांच्या सामुदायिक रामरक्षा पठण सोहळ्याची समाप्ती झाली . गुढीपाडवा ते रामनवमी या काळात रामरक्षा पठण करण्यात येत होते . या पठणाची समाप्ती आज करण्यात आली . कीर्तन सोहळा
आयोजित करण्यात आला होता . या सोहळ्याचे हे १५ वे वर्ष होते . केशव मोडक
,रेवती मोडक ,अमित मोडक ,अमेय मोडक परिवाराने स्वागत केले .

