रोटरी क्लब डिस्ट्रीक्ट 3131 यांच्या वतीने वॉटर फेस्टीव्हल चे आयोजन

Date:

पुणे :‘रोटरी क्लब डिस्ट्रीक्ट 3131’ यांच्या वतीने दिनांक 20 मार्च ते 22 मार्च 2018 या तीन दिवसीय ’जलोत्सव’ 2018 (वॉटर फेस्टीव्हल) चे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती रोटरी प्रांत पुणे ३१३१चे प्रकल्प संचालक आणि ‘जलोत्सव’ (वॉटर फेस्टीव्हल) चे संयोजक सतीश खाडे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेला गणेश जाधव, (अध्यक्ष, रोटरी क्लब ऑफ पुणे गांधी भवन)​​,​उदय कुलकर्णी, (अध्यक्ष, रोटरी क्लब ऑफ पुणे रॉयल)​,​दीप्ती पुजारी (पौड रोड रोटरी अध्यक्ष)​,​नितीन चौरे,सुजाता कुलकर्णी, दिनकर पळसकर, अशोक भंडारी उपस्थित होते.पुण्यातील १० रोटरी क्लब एकत्र येऊन हा जलोत्सव आयोजित करीत आहेत.​यामध्ये​’​रोटरी क्लब ऑफ पुणे सिंहगड रोड

​’​रोटरी क्लब ऑफ पुणे सहवास
​’रोटरी क्लब ऑफ पुणे गांधीभवन
​’​रोटरी क्लब ऑफ निगडी
​’​रोटरी क्लब ऑफ रॉयल
​’रोटरी क्लब ऑफ पौड रोड
​’​रोटरी क्लब ऑफ शनिवारवाडा
​’​रोटरी क्लब ऑफ अपटाऊन
रोटरी क्लब ऑफ चिंचवड
​’​रोटरी क्लब ऑफ साऊथ
​’​यांचा समावेश आहे.​या तीन दिवसीय जलोत्सवाचे उदघाटन मंगळवार, दिनांक 20 मार्च रोजी दुपारी दीड वाजता साहित्य संमेलन अध्यक्ष डॉ. लक्ष्मिकांत देशमुख यांच्या हस्ते होणार आहे. ‘जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन, घोले रोड येथे हा कार्यक्रम होईल.

जलोत्सवातील मान्यवरांची मार्गदर्शक व्याख्याने दुपारी १.३० ते रात्री ८ या वेळात ‘जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन’, घोले रोड येथे होणार आहेत.

‘महाराष्ट्रातील 500 हून अधिक रोटरी क्लब आणि 25 हजारांहून अधिक रोटेरियन्सनी उभा केलेला सकारात्मक ऊर्जेचे प्रतिनिधीत्व हा जलोत्सव करतो आहे. शहरी व ग्रामिण नागरिकांमध्ये जल साक्षरता निर्माण व्हावी, तसेच उद्योग, प्रशासन, धोरण कर्त्यांसाठी, शेतकर्‍यासाठी, रोटेरियन्ससाठी मुलांसाठी आणि पुढच्या पिढीसाठी या जलोत्सवाच्या माध्यमातून जल साक्षरता निर्माण होऊन हे कार्य पुढे चालू राहावे या प्रमुख उद्देशाने या ‘ वॉटर फेस्टिव्हल’चे आयोजन करण्यात आले’, असल्याचे ‘फेस्टिव्हल’चे संयोजक सतीश खाडे यांनी  सांगितले.

या महोत्सवामध्ये अनेक मान्यवर पाणी विषयक विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. यामध्ये साहित्य आणि जलसाक्षरता, पाणी आणि अंधश्रद्धा, कुरणशेती, वॉटर ऑलिपियाड, पाण्याचा टाहो, बारीपाडा विकास मॉडेल, क्षारशेती, महानगरांच्या तोंडचे पाणी पळणार, भारतीय संस्कृती आणि मान्सून, पुण्याच्या पाण्याचे नियोजन, दुष्काळमुक्त बुलढाणा, विनावीज- विनाखर्च पाण्याचा पुर्नवापर या विषयांचा समावेश आहे.

महापौर मुक्ता टिळक, उपेंद्र घोडे, डॉ. धनंजय नेवाळकर, प्रदीप पुरंदरे, चैत्राम पवार, दिनेश कुंवर, डॉ. श्रीकांत गबाले, भरत व्हयगाले, दिगंबर डुबल, सतीश वैजापूरकर, मयुरेश प्रभुणे, शिवानी चौगुले, अरुण म्हात्रे, शांतिलाल मुथा, डॉ. समीर शास्त्री, आदी मान्यवर ‘जलोत्सव’ (वॉटर फेस्टिव्हल) मध्ये मार्गदर्शन करतील.

पाणी विषयक क्षेत्रात काम केलेल्या स्वयंसेवी संस्थाचा या फेस्टिव्हलमध्ये गौरव करण्यात येणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील अनेक रोटरी क्लबने जलसंवर्धनासाठी  केलेल्या कामाचा आढावा घेण्यात येईल. यात रोटरीच्या  3131,3132,3142 या  प्रांतांचा समावेश आहे. अनेक संस्थांचा समावेश आहे. उल्लेखनीय कार्य करणार्‍या अनेक ‘रोटरी क्लब’ चा सन्मान देखील करण्यात येणार आहे.

महोत्सवाची सांगता रोटरी वॉटर ऑलिम्पियाडमधील यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण कार्यक्रमाने  होईल . हा कार्यक्रम  डॉ. नितीन करमळकर (कुलगुरू, सावित्रीबाई फुले  पुणे विद्यापीठ ) व उद्योजक किशोर देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल.

यावर्षी जलोत्सव मोबाईल फोनवर सुद्धा पाहता येईल, त्यासाठी तीन दिवसांसाठी फक्त दहा रुपयांचे डिजीटल पासेस उपलब्ध होतील, असे या वेळी सांगण्यात आले

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

जर्मनीतील शिक्षणा करीता मार्गदर्शन

पुणे, १३ मार्च २५ - सिंबायोसिस स्कील्स ॲन्ड प्रोफेशनल...

एलईडी चित्ररथाच्या माध्यमातून समाज कल्याण विभागाच्या योजनांचा जागर

पुणे दि. १३: समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांची माहिती...

बंदिशींद्वारे भारतीय स्त्री शक्तीचा सन्मान

भक्तिसुधा फाऊंडेशनच्या वतीने उर्जा' : सन्मान भारतीय स्त्री आदर्शांचा...