पुणे : एमसीई सोसायटीच्या एम.ए.रंगूनवाला इन्स्टिटय़ूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड रिसर्चच्या वतीने परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.
‘गो ग्रीन: अ न्यू वे फॉर हॉटेल इंडस्ट्री’ या विषयावरील हा परिसंवाद सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळाच्या अंतर्गत आयोजित केला गेला.
महाविद्यालयाच्या प्राचार्य अनिता फ्रांत्झ यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.
परिसंवादामध्ये आर्किटेक्ट अनघा परांजपे-पुरोहित आणि कांचन सिधये (व्हीके: ई पर्यावरण) यांनी पर्यावरण संबधीत इमारती आणि अशा इमारत संबंधित प्रमाणपत्रे, नियम व अटी आणि हॉटेलमध्ये पर्यावरणाची स्थिरता त्यासाठी उपाय या विषयी मार्गदर्शन केले.
परिसंवादाला चांगला प्रतिसाद मिळाला.