रंगूनवाला इन्स्टिटयूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटमध्ये ‘अॅन्युअल डे’
पुणे :
‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’च्या ‘एम. ए. रंगूनवाला इन्स्टिटयूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट’मध्ये ‘अॅन्यअल डे’ साजरा करण्यात आला. ‘बॉलरूम पार्टी’ या संकल्पनेवर आधारित परफॉर्मन्स विद्यार्थ्यांनी सादर केले. यामध्ये प्रथम वर्षाचे विद्यार्थी सहभागी झाले. पाककृती स्पर्धा घेण्यात आल्या. ‘बेस्ट शेफ’ना पारितोषिके देण्यात आली. प्रा. अनिता फ्रान्झ यांच्या हस्ते पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. हा कार्यक्रम आझम कॅम्पस येथे झाला.