पुणे :दि मुस्लीम को- ऑपरेटिव्ह बँकेने जागतिक महिला दिनानिमित्त महिलांच्या सत्कार समारंभाचे आयोजन केले होते.
आझम कॅम्पस हायटेक हॉल येथे महाराष्ट्र कॉसमॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या उपाध्यक्ष अबेदा इनामदार यांच्या हस्ते सत्कार समारंभ झाला.
यामध्ये वैद्यकीय, कायदा, फार्मसी, फिझिओथेरपीस्ट, समाजकार्य अशा विविध क्षेत्रातील कार्यरत महिलांना गौरविण्यात आले. यावेळी मुमताझ सय्यद, तब्बसूम इनामदार, डॉ.शायबाज दारूवाला इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

