​​ ‘जश्न – ए -सर सय्यद’ : अल्पसंख्याकांच्या शिक्षण महर्षीच्या, प्रागतिक विचारांचा पुण्यात महोत्सव

Date:

पुणे :​’शिक्षण आणि सामाजिक प्रगतीपासून दूर असलेल्या अल्पसंख्य मुस्लिम समाजास सर सय्यद यांनी शिक्षणाची दिशा दाखवली आणि पुढे त्याचे रूपांतर अलिगढ मुस्लिम विद्यापीठ या शैक्षणिक चळवळीत झाले. त्यामुळॆ सर सय्यद यांच्या विचारांचा महोत्सव पुण्यासारख्या शैक्षणिक शहरात होतोय ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे’,असे प्रतिपादन अभ्यासक,लेखक शामिम तारिक यांनी केले. ​

‘डेक्कन मुस्लिम इन्स्टिट्यूट’ आणि ‘नॅशनल कौंसिल फॉर प्रमोशन ऑफ उर्दू लँग्वेज’, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जश्‍न – ए- सर सय्यद’ या दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले
​होते.या दोन दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन शुक्रवा​री दुपारी हाय-टेक हॉल, आझम कॅम्पस येथे​झाले.
सर सय्यद यांना अल्पसंख्यक शैक्षणिक, सामाजिक, प्रागतिक चळवळीचे प्रणेते मानले जाते.
​डेक्कन मुस्लिम इन्स्टिट्यूट च्या अध्यक्ष आबेदा इनामदार ​उदघाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. व्यासपीठावर
​मुन्नवरपीरभॉय,शाहिदा सय्यद उपस्थित होते.

या कार्यशाळेमध्ये डॉ. गुलाम दस्तगीर (संचालक,‘डेक्कन मुस्लिम इन्स्टिट्यूट’), डॉ. कमार सिद्दीकी (मुंबई), डॉ.अल्ताफ अन्जुंमन (काश्मीर), डॉ. काझी नावेद (औरंगाबाद), डॉ. जनीसार मोईन (हैदराबाद), डॉ. समीना पठाण (पुणे) आदी सहभागी
​झाले ​विविध स्पर्धा,पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन,माहितीपट प्रदर्शन,व्याख्याने या दोन दिवसीय महोत्सवात आयोजित करण्यात आली होती.
उदघाटन कार्यक्रमात बोलताना शामिम तारिक म्हणाले ,’सर सय्यद यांनी शिक्षणाची प्रेरणा दिल्याने पुढे मोठ्या गावांमध्ये अल्पसंख्य मुस्लिमांना शिक्षण देणाऱ्या शैक्षणिक संस्था उभ्या राहिल्या. सर सय्यद यांनी लेखनातून क्रांती घडवली. काळाच्या पुढचे विचार मांडले.
‘सर सय्यद यांची शिकवण आजही अल्पसंख्य मुस्लिम समाजाला प्रगतीच्या दिशा दाखवत आहे,
​ ​युवकांना प्रेरणा देत आहे’,असे आबेदा इनामदार यांनी अध्यक्षस्थानावरून बोलताना सांगितले. ​
कार्यशाळेच्यासमारोप कार्यक्रमा​लाप्रमुख पाहुणे​म्हणून ​प्रा.तारिक मन्सूर (कुलगुरू, अलिगड मुस्लिम युनिव्हर्सिटी)​उपस्थित ​​होते​.डॉ. पी.ए.इनामदार (नॅशनल कौंसिल फॉर प्रमोशन ऑफ उर्दू लँग्वेज, नवी दिल्ली, मंडळाचे माजी सदस्य) उपस्थित​ होते
कार्यशाळेचा ​समारोप कार्यक्रम डॉ. ए. आर. शेख असेंब्ली हॉल, आझम कॅम्पस येथे ​झाला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचा जाधव कुटुंबीयांच्या डोक्यावर मायेचा हात…

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी घेतली स्वर्गीय विदीप जाधव...

बेकायदेशीर रसायनांचा वापर केल्यामुळे  ‘कॉम्फर्ट’ अगरबत्तीवर बंदी

Mumbai February 02, 2026: भारतामध्ये घरगुती कीटकनाशकांच्या सुरक्षित वापरास प्रोत्साहन देणाऱ्या ना-नफा तत्वावरील उद्योग मंडळ होम इन्सेक्ट कंट्रोल असोसिएशन (HICA) तर्फे बेकायदेशीर डास प्रतिबंधक अगरबत्ती ‘कॉम्फर्ट’ विरोधात महाराष्ट्र सरकारने केलेल्या कारवाईचे स्वागत करण्यात आले आहे. ‘कॉम्फर्ट’ ही डास प्रतिबंधक अगरबत्ती महाराष्ट्र, तमिळनाडू, उत्तर प्रदेश आणि दिल्ली येथे विक्रीस उपलब्ध असून ती मेसर्स धूप छांव कंपनी यांचे उत्पादन आहे. खुल्या बाजारातून गोळा करण्यात आलेल्या नमुन्यांवरून हे उत्पादन अनभिज्ञ ग्राहकांकडून खरेदी केले जात असल्याचे स्पष्ट झाले असून, महाराष्ट्र कृषी विभागाने केलेल्या प्रयोगशाळा चाचण्यांमध्ये ‘कॉम्फर्ट’ मध्ये बेकायदेशीर आणि मान्यता नसलेले रसायन डाइमफ्लुथ्रिन आढळून आले आहे. ‘कॉम्फर्ट’ अगरबत्त्या मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक तसेच उर्वरित संपूर्ण महाराष्ट्रात विक्रीस असल्याचे सांगितले जाते. मुंबईमध्ये टाकण्यात आलेल्या छाप्यादरम्यान अधिकाऱ्यांना डाइमफ्लुथ्रिन असलेल्या ‘कॉम्फर्ट’ अगरबत्त्यांचे अनेक बॉक्स आढळून आले. धूप छांव कंपनी कडे परवाना तसेच CIBRC मान्यता या दोन्ही गोष्टी नसल्यामुळे, कीटकनाशके अधिनियम, 1968 आणि कीटकनाशके नियम, 1971 अंतर्गत या उत्पादनाचे उत्पादन व विक्री बेकायदेशीर ठरते. हर्बल असल्याचा खोटा दावा करत अनेक बेकायदेशीर अगरबत्त्या विक्रीस आणल्या जात असून, त्यामध्ये बेकायदेशीर आणि शासनमान्य नसलेली रसायने वापरली जात आहेत. ‘कॉम्फर्ट’, ‘स्लीपवेल’ आणि ‘रिलॅक्स’ या नावांनी विक्री होणारी उत्पादने यामध्ये ओळखली गेली आहेत. यामुळे भारतभर मान्यता नसलेली कीटकनाशके असलेल्या बेकायदेशीर डास प्रतिबंधक अगरबत्त्यांविरोधात अंमलबजावणी कारवाईत वाढ झाली असून, नियामक सतर्कता आणि सार्वजनिक आरोग्याबाबतची चिंता अधिक तीव्र होत असल्याचे दिसून येते. कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय यांच्या अंतर्गत कार्यरत असलेली केंद्रीय कीटकनाशक मंडळ व नोंदणी समिती (CIBRC) ही वैधानिक संस्था असून, भारतात डास प्रतिबंधकांमध्ये वापरल्या जाणाऱ्या रसायनांना उत्पादन, आयात किंवा विक्रीपूर्वी मंजुरी व नोंदणी देण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. शासनमान्य CIBRC-मान्यताप्राप्त डास प्रतिबंधक उत्पादनांवर नोंदणी क्रमांक (CIR –...

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार याच पक्षाध्यक्ष हव्यात,चित्रपट व सांस्कृतिक विभागाची आग्रही मागणी

पुणे-उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार याच पक्षाध्यक्ष हव्यात अशी आग्रही मागणी...

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लाडक्या बहिणींना दिली नेतृत्वाची संधी

महिलांसाठी महापौरपद आरक्षित नसताना ‘लाडक्या बहिणीं’कडे जबाबदारी; हा शिवसेनेचा...