पुणे :’एसएई इंडिया (सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनिअर्स) यांच्या वतीने आयोजित दहाव्या ’अ वर्ल्ड इन मोशन ‘ नॅशनल ऑलिंपिक्स’ मध्ये ‘स्किमर’ मेकिंग विभागा मध्ये श्रीमान गंगाधर गोविंद पटवर्धन इंग्लिश मीडियम स्कूल (रत्नागिरी) आणि ‘जेट टॉय’ मेकिंग विभागामध्ये सौपीन्स स्कूल (चंदीगड) यांनी विजेतेपद पटकाविले.
‘ऑल इंडिया कौंसिल फॉर टेक्निकल एज्युकेशन’, दिल्ली चे अध्यक्ष डॉ अनिल सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले, अशी माहिती डॉ.के.सी.व्होरा (अध्यक्ष एस एई इंडिया वेस्टर्न) यांनी दिली.
यावेळी अतुल कुंटे, ललीतकुमार सूर्यवंशी, नितीन चाळके, सुनील कुलकर्णी, शिखर भटनागर, अनील गुप्ता, सुबोध मोर्ये आदी मान्यवर उपस्थित होते.
देशभरातून 30 शहरातील विविध शाळांमधून 80 संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते. या स्पर्धतील विजेते डेट्रॉईट (अमेरिका ) येथील जागतिक पातळीवरील ‘ अ वर्ल्ड इन मोशन’ ऑलिंपिक्स मध्ये सहभागी होणार आहेत.
एआरएआय (ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया), ‘इटॉन टेक्नॉलॉजी’, ‘कमिन्स इंडिया’, ‘महिंद्रा अँड महिंद्रा, ‘जॉन डियर’, ‘ट्रीम इंडिया’, ‘अल्टीअर’, ‘मारूती सुजूकी’, ‘फेडरल मोगूल’, ‘आय ए सी’, ‘अँसिस’, ‘व्ही.जी.ए. प्रींटरसँड हॉस्पिटॅलिटी’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ही स्पर्धा पुण्यात अलिकडेच कमिन्स इंडिया ऑफिस कॅम्पस, बालेवाडी येथे पार पडली.
’फ्युएल ग्रुप’ चे केतन देशपांडे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले होते.
इयत्ता पाचवीसाठी आयोजित स्किमर मेकिंग स्पर्धेमध्ये ‘श्रीमान गंगाधर गोविंद पटवर्धन इंग्लिश मीडियम स्कूल’ (रत्नागिरी) विजयी ठरले. ‘जी.पी.एच.एस हॉन्नासांद्र’, बंगळूरू यांनी प्रथम उपविजेतेपद तर ’व्हॅलेन्टाईन सर्कल इंग्लिश मीडियम स्कूल’, सोलापूर यांनी द्वितीय उपविजेतेपद मिळविले.
इयत्ता सहावीसाठी आयोजित जेट टॉय स्पर्धेमध्ये सौपीन्स स्कूल (चंदीगड) यांनी विजेतेपद पटकाविले. आश्रय नीलबाघ स्कूल, बंगळूरू यांनी प्रथम उपविजेतेपद तर प्रगति माध्यमिक विद्यालय, नाशिक यांना द्वितीय उपविजेतेपद मिळाले.