पुणे : प्रजासत्ताक दिनानिमित्त ’वन स्टेप फाऊंडेशन’ च्या वतीने आणि ‘एसजीएम मॉल’ च्या सहकार्याने सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणांचा सत्कार करण्यात आला. सत्कारार्थीना ’पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस’ च्या शहराध्यक्ष, खासदार वंदना चव्हाण यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
या कार्यक्रमांतर्गत इंदिरा भिलारे (संस्थापक अध्यक्ष बहुउद्देशीय धर्मादाय संस्था), विराज तावरे, सचिन बेनकर, महेश घाग, पुजा भाले या पाच जणांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी ‘सिप्पा डान्स अकादमी’ च्या वतीने नृत्य कार्यक्रमाचे देखील आयोजन केले होते. यामध्ये ४ संघातून २०० जणांनी सादरीकरण केले. हा कार्यक्रम शुक्रवारी ‘एसजीएम मॉल’, मोलेदिना रोड कॅम्प येथे सायंकाळी झाला.
समाजात सुधारणा घडवून आणणे आणि समाजाच्या चांगल्या भविष्यासाठी उपक्रम राबवले जावे या हेतूने ’वन स्टेप फाऊंडेशन’ संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. संस्थेच्या वतीने प्रथमच आयोजित या सत्कार कार्यक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये ययाती चरवड , साहिल शाह, विकास वाघे, विक्रम जाधव, विशाल मोरे यांचा सहभाग होता.
पर्यावरण संरक्षण संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमात तरुणाईला पर्यावरणविषयक जनजागृती करणे आणि प्रोत्साहन देणे या विषयी मार्गदर्शन करण्यात आले.