पुणे :
गायनाप्रती समर्पित भाव, रसिकांना उत्तम तेच देण्याचा ध्यास, आणि भावंडामधील नात्याची घट्ट वीण हेच मंगेशकर कुटुंबियांचे आयुष्य आहे ‘ अशा शब्दात रचना खडीकर -शहा यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
लतादीदींच्या भगिनी मीना खडीकर यांच्या कन्या रचना खडीकर – शहा यांनी पुणेकर श्रोत्यांना जगप्रसिद्ध मंगेशकर कुंटुंबियांच्या गायनप्रवासाचा आणि परस्पर जिव्हाळ्याचा गोफ उलगडून दाखवला आणि रसिक त्यात रमून गेले.
निमित्त होते
रिदम वाघोलीकर, आशय वाघोलीकर आयोजित
लेखिका रचना खडीकर-शहा यांच्या ‘रचना: क्रिएटिंग पॉसिबिलीटीज’ या कार्यक्रमाचे !
शुक्रवारी
हा कार्यक्रम सुमंत मुळगावकर सभागृह ,आयसीसी टॉवर येथे झाला. रचना खडीकर -शहा यांच्याशी
गीता सिंग-परवेझ
यांनी संवाद साधला.
यावेळी सुधीर वाघोलीकर, अनुराधा वाघोलीकर, बेला कामदार, प्रतीक रोकडे, अविनाश गवई उपस्थित होते.
या कार्यक्रमानंतर
लता मंगेशकर यांनी दूरध्वनी वरून चाहत्यांशी संवाद साधला. या संवादादरम्यान
पुण्यातील युवक रिदम वाघोलीकर
निर्मित आणि
अतिथी संपाद
क
रचना शहा यांच्या
‘स्वरलता’
या
कॉफी टेबल बुक
चे कौतुक केले.
मंगेशकर कुटुंब हा स्नेहाचा गोफ :
रचना शहा
लतादीदी परफेक्शनिस्ट आहेत त्या महिनाभर आधी स्टेज परफॉर्मन्सची तालीम करतात. ‘श्रोते माझं गाणं प्रेमाने ऐकायला येतात. त्यांच्याशी बेईमानी करू नये
! ‘ असं दीदी घरी सांगतात.
त्यामुळे त्या स्टेजवरून गातानाही अगदी रेकॉर्डिंग रूममध्ये गात असल्यासारखं फिलिंग यायचं
लतादीदी माझ्यासाठी अगदी आईच्या जागीच आहे. त्यांनी मला आई सारखेच प्रेम दिलं, जीव लावला ‘ असंही रचना यांनी सांगीतले.
माझी मावशी उषा मंगेशकर ही जितकी चांगली गायिका आहे
,
तेवढीच उत्कृष्ट चित्रकार (आर्टिस्ट) आहे. त्यांची चित्रकला चांगली की गायकी अधिक चांगली,
हे सांगणं कठीण आहे. सर्व इमारतीतील लहान मुलांचे लाड करणे त्यांना आवडते.
आशा मावशी ही अत्यंत सुंदर गाणी आणि चविष्ट पदार्थ करण्यासाठी प्रसिद्ध आहे. कुकींग आशा मावशीचं पॅशन आहे.
आशा मावशी खूप उत्स्फूर्त व्यक्तिमत्त्व आहे. आशा मावशीमधील निरागसता तिने अजून जपली आहे. आजकाल मुलांमध्येही निरागसता नसते. पण वयाच्या
८०
च्या घरातही आशा मावशीने ती जपली आहे.
अगदी परदेशात कुठल्याही ‘लाईव्ह कॉन्सर्ट’ला जाण्यापूर्वी आशा मावशी लतादीदींचे चरणस्पर्श करून आशीर्वाद घेते, असे त्यांचे नाते आहे.
परदेशात शो करताना सुद्धा, आशा मावशीची तब्येत ठीक नसेल, तर लतादीदी त्यांना फोन करून विचारते. ‘तू बरी आहेस का, तब्येत ठीक नसेल, तर गाऊ नको, परत शो कॅन्सल करून भारतात परत ये’ अशा प्रकारची काळजी आणि प्रेम आशा मावशी आणि लतादीदीमध्येेे आहे.
इतर भावा-बहिणीप्रमाणेच त्यांच्यातही घट्ट नातं आहे. छोट्या-मोठ्या तक्रारी वादविवाद सर्वत्र होतात, तसेच त्यांच्यातही होतात. पण त्या दोघींचे नाते खूप घट्ट आहे. दोघांमध्ये खूप प्रेम आहे. याचं कारण माझी आजी आहे. माई मंगेशकर तिने सर्वघराला एकत्र बांधून ठेवले म्हणायची.’ बाहेरील लोक तुमच्यावर टीका करतील, तुमच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न करतील, पण तुम्ही एकत्र रहा, टीकेकडे दुर्लक्ष करा.

