राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा-आकाश राजभोर व नई चौधरी प्रथम क्रमांकाचे मानकरी
पुणे:
‘महाराष्ट्र कॉस्मोपाॉलिटन एज्युकेशन सोसायटी’च्या इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी (डिप्लोमा) आणि ‘महाराष्ट्र स्टेट बोर्ड टेक्निकल एज्युकेशन’(मुंबई) यांच्या संयुक्तविद्यमाने ‘फार्मा व्हिजन 2017-18’ राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन केले होते. नुकत्याच झालेल्या या स्पर्धेत राज्यातील विविध भागातून 30 संघ सहभागी झाले होते, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य प्राचार्य डॉ. व्ही. एन. जगताप यांनी दिली.
डॉ. व्ही. एम. मोहितकर (संचालक, महाराष्ट्र स्टेट बोर्ड टेक्निकल एज्युकेशन’ मुंबई) यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले, ‘फार्मसी संस्थांनी उत्कृष्ट दर्जाचे शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करावे. आपल्याला जे आवडते तेच कार्य करा तरच तुम्ही तुमच्या कामावर प्रेम कराल.’
तसेच त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावरही आपले विचार मांडले.
यावेळी डॉ. एम. आर. चितलंगे (उपसचिव एम.एस.बी.टी.आर.ओ, पुणे), लतिफ मगदूम (एमसीई सोसायटीचे सचिव), प्रा. इरफान शेख (एमसीई सोसायटीचे सहसचिव) आदी मान्यवर उपस्थित होते.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. एन. जगताप यांनी स्वागत केले. ‘इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी’ (डिप्लोमा) हे भारतातील प्रथम डिप्लोमा फार्मसी इन्स्टिट्यूट आहे ज्याने ‘नॅशनल बोर्ड ऑफ अॅक्रिडीटेशन’ला अर्ज करून परिक्षण झालेले आहे, असे त्यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले.
डॉ. एम. आर. चितलंगे यांनी ‘महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन’च्या विविध योजना व उपक्रमाची माहिती दिली व उत्तम नियोजनाबद्दल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचे आभार मानले.
या स्पर्धेचे मोहन बांदीवडेकर (माजी प्राचार्य के. डी. सी. ए. चे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, कोल्हापूर), ए. के. आपटे (उपप्राचार्य, डॉ. जे. झे. मगदूम फॉर्मसी कॉलेज, जयसिंगपूर) आणि अमोल शहा (सीताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसी, शिरूर) हे परीक्षक होते
या स्पर्धेतील विजेत्यांनामोहन बांदीवडेकर (माजी प्राचार्य के. डी. सी. ए. चे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, कोल्हापूर) यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली.
या स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक आकाश राजभोर, नई मुद्दीन चौधरी (एमईटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी (डिप्लोमा) बांद्रा, मुंबई) यांनी पटकाविले. पारितोषिकाचे स्वरूप रुपये 7500 व प्रशस्तीपत्रक होते.
द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक प्रणिता खारतोडे, साजिद पठाण (दत्तकला शिक्षण संस्थेचे, अनुसया इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी(डिप्लोमा) दौंड पुणे) यांनी जिंकले. रुपये 5000 व प्रशस्तीपत्रक असे पारितोषिकाचे स्वरूप होते
तृतीय क्रमांकाचे पारितोषिक रुपये 2500 व प्रशस्तीपत्रक मानसी देशमुख आणि नम्रता लोखंडे (व्ही. जे. एस. एम. मुंबई इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी फॉर वुमेन जुन्नर) यांना मिळाले
महाराष्ट्र राज्यातील विविध भागातील फार्मसी महाविद्यालयातील प्राचार्य देखिल उपस्थित होते.
स्पर्धेचे सूत्रसंचालन सबा शेख यांनी केले. किर्ती सपारे यांनी आभार मानले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी मोलाचे योगदान दिले.