‘ओन्ली एच आर’ संस्थेला ‘आऊटस्टँडिंग एच आर इनिशिएटिव्ह’ अवॉर्ड प्रदान
पुणे : पुण्यातील कंपन्या, आस्थापनांच्या मनुष्यबळ विकास व्यवस्थापक, अधिकाऱ्यांची शिखर संस्था असलेल्या ‘ओन्ली एच आर’ संस्थेला ‘आऊटस्टँडिंग एच आर इनिशिएटिव्ह’ अवॉर्ड मिळाले आहे. ‘राष्ट्रीय युवा सप्ताहा’निमित्त ‘एमपीटीए एज्युकेशन’ परिवर्तन कार्यक्रमात हे पारितोषिक देण्यात आले . मनुष्यबळ विकास अधिकारी, व्यवस्थापकांसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम आयोजित केल्याबद्द्दल हे पारितोषिक मिळाल्याची माहिती ओन्ली एच आर’ संस्थेचे संस्थापक जितेंद्र पेंडसे दिली.
नेहरू हॉल, घोले रोड येथे नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात सदानंद देशपांडे (व्यवस्थापकीय संचालक, एमपीटीए एज्युकेशन), श्री. शेखर (संचालक, एमपीटीए एज्युकेशन), श्री. कऱ्हाडकर (संचालक, एमपीटीए एज्युकेशन) यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. ओन्ली एच आर संस्थेचे विश्वस्त जितेंद्र पेंडसे आणि सुधीर पाठक यांनी हे पारितोषिक स्वीकारले.