पुणे :’महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’च्या ‘मराठी अकादमी’तर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवडयानिमित्त काव्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.
आझम कॅम्पस ग्रीन ऑडिटोरियम येथे हे काव्य संमेलन झाले. गझलकार श्रीनिवास वारुंजीकर यांनी उद्घाटन केले आणि गझल सादर केल्या.
उद्घाटन प्रसंगी वारुंजीकर म्हणाले, ‘आझम कॅम्पसच्या पुढाकाराने मराठी भाषा पंधरवडा साजरा होत आहे, ही उल्लेखनीय गोष्ट आहे. मराठी लेखनात काव्य हा लोकप्रिय काव्यप्रकार आहे. कविता लिहिणे हा आनंददायक प्रकार असतो. भावनांना शब्दात आपण दाद देतो तेव्हा कविता जन्माला येते. मिर्झा गालीब यांची शायरी लिहिण्यावरील निष्ठेने समाजात लोकप्रिय झाली. मराठीतून स्वाक्षरी करण्याचे आवाहन त्यांनी केले. ‘
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ‘अँग्लो उर्दू बाईज हायस्कुल अँड ज्युनिअर कॉलेज’ च्या प्राचार्य परवीन शेख यांनी केले. मराठी अकादमीच्या संचालक नूरजहाँ शेख यांनी संयोजन केले.
परीक्षण नूतन शेटे, झुबेर पटेल यांनी केले. इम्रान झारेगीर यांनी आभार मानले. केतकी भोसले उपस्थित होत्या. २०० हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले.