पुणे :
पैठणीच्या इतिहासाच्या किश्श्याना गाण्यांची सुरेल साथ ,महिला कलाकारांचा पैठणी रॅम्प वॉक ,सणावारांच्या गीतांवरील नृत्ये ,बेटी बचाओ -बेटी बढाओ ‘ चा संदेश आणि ऑटिझम बालकांच्या साठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा कृतज्ञ सन्मान अशा वातावरणात ‘पदरावरील शब्द गुंफण ‘ हा कार्यक्रम गाजला !
गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या गायन क्षेत्रातील कारकिर्दीला ७५ वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून ‘गंधार ‘ एंटरटेनमेंट , भाजपच्या ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ ‘अभियानाच्या संयोजिका उषा वाजपेयी, महक, सर्वोत्कर्ष चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थांच्या वतीने ‘पदरावरील शब्द गुंफण’ या सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते
बुधवारी सायंकाळी बालगंधर्व रंगमंदिर येथे हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. ५० कलाकारांच्या साथीने नृत्य, नाट्य, संगीत, पैठणी फॅशन शो, रॅम्प वॉक असे या कार्यक्रमाचे स्वरूप होते.
उदघाटन प्रसंगी उषा बाजपेयी (बेटी बचाओ, बेटी पढाओ,प्रदेश समन्वयक ), निश्चल लताड , राजेश दातार ,मनीषा लताड ,शीतल रुद्रवार , राजीव गुप्ते ,मुकुंद वर्मा , आदी उपस्थित होते.
कार्यक्रमा दरम्यान ‘आरंभ ऑटिझम’ संस्थेच्या अंबिका टाकळकर ,तसेच ऑटिझम बालकांच्या समुपदेशनासाठी कार्यरत दया इंगळे यांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाची संकल्पना आणि दिग्दर्शन शीतल देशपांडे यांचे होते. कार्यक्रमाचे निवेदन प्रेषित रुद्रवार ,शोभा कुलकर्णी यांनी केले. मनीषा लताड,शीतल सरताज ,शीतल रुद्रवार,संदीप पाटील,गफार मोमीन आणि ५० कलाकारांनी सहभाग घेतला . संगीत संयोजन प्रसन्न बाम यांचे होते तर नृत्य दिग्दर्शन रोहित महाजन यांचे होते .