पुणे-अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेचे अनंतराव पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च महाविद्यालयाच्या वतीने हर घर तिरंगा अभियाना अंतर्गत स्वातंत्र्याच्या अमृत मोहोत्सावा निमित्त प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रभात फेरीमध्ये महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग, विद्यार्थी विकास मंडळ विभागाच्या वतीने प्रभात फेरी काढण्यात आली. भारतीय स्वातंत्र्यास ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या मनामध्ये स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती जागृत राहाव्यात, स्वतंत्र लढ्यातील क्रांतिकारकांच्या कार्याची प्रेरणा जनमानसात निर्माण व्हावी यासाठी महाविद्यालयाच्या वतीने हर घर तिरंगा अभियाना अंतर्गत प्रभात फेरीची सुरवात अनंतराव पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च महाविद्यालया पासून रामणा गणपती चौक मार्गे पर्वती पायथा, बँक ऑफ महाराष्ट्र व गजानन महाराज चौक मार्गे महाविद्यालय अशी काढण्यात आली. या वेळी दत्तवाडी पोलीस ठाणे चे वरीष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन, पोलीस निरीक्षक विजय खोमणे, महिला पोलीस उपनिरीक्षक शिवनंदा जाधव, पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत कामठे, सिद्धनाथ खांडेकर, प्रसाद डोंगरे,सर्व पोलीस कर्मचारी या प्रभात फेरी मध्ये सहभागी झाले व त्यांनी हर घर तिरंगा अभियाना अंतर्गत जन जागृती केली. या प्रसंगी सहभागी सर्व विद्यार्थी, प्राध्यापक, पोलीस अधिकारी यांना राष्ट्र ध्वजाचे वाटप करण्यात आले. राष्ट्रिय सेवा योजना विभागाच्या विद्यार्थ्यांनी विविध घोषणाबाजी करून जनजागृती केली. सदर प्रभात फेरी साठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनिल ठाकरे, सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक, राष्ट्रिय सेवा योजना अधिकारी, विद्यार्थी विकास मंडळाचे अधिकारी, क्रीडा संचालक व विद्यार्थ्यानी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. या प्रभात फेरीचे आयोजन क्रीडा संचालक डॉ. नवनाथ सरोदे,प्रा. सुप्रिया शिंदे, प्रा.वैशाली भीमटे यांनी केले. या कार्यक्रमाचे आयोजन केल्या बद्दल अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या सरचिटणीस मा.सौ.प्रमिला गायकवाड यांनी सर्वांचे अभिनंदन केल.

