Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

जिकडे भेळ तिकडे खेळ …आघाडीच्या 9 आमदारांसह अनेक पदाधिकारी भाजप-सेनेच्या वाटेवर

Date:

पुणे-(‘प्राब’कडून)

काँग्रेस, राष्ट्रवादीमध्ये बंडाळीचे चिन्ह असून विद्यमान 9 आमदारांसह अनेक विद्यमान व माजी पदाधिकारी भाजप-सेनेच्या वाटेवर आहेत. तर काँग्रेस, राष्ट्रवादीतील काही इच्छूकांची पाऊले बहुजन वंचित आघाडीकडे वळली आहेत. लोकसभा निवडणुकीत बहुजन वंचित आघाडीला ज्या विधानसभा मतदारसंघात जास्त मते प्राप्त झालेली आहेत अशा मतदारसंघावर काँग्रेस व राष्ट्रवादीतील इच्छूकांचा डोळा आहे. काँग्रेस पेक्षा राष्ट्रवादीला जास्त खिंडार पडण्याची शक्यता आहे. जयदत्त क्षीरसागर आणि पांडुरंग बरोरा यांच्यानंतर आता राष्ट्रवादीला गळती लागण्याची चिन्ह आहेत. राष्ट्रवादीचे अनेक आमदार भाजपच्या संपर्कात आहेत. सोबतच जिथे जागा शिवसेनेकडे आहे तिथे आमदार शिवसेनेत प्रवेश करण्याच्या मार्गावर असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील आमदारही पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत. विद्यमान आमदार व पदाधिकारी यांच्यामध्ये भारत भालके, सिध्दाराम म्हेत्रे, जयकुमार गोरे, बबनदादा शिंदे, दिलीप सोपल, ज्योती कलानी, संग्राम जगताप, अवधूत तटकरे, रमेश कदम, दत्तात्रय भरणे, प्रदीप कंद, चेतनसिंह केदार, रणजित शिंदे आदि. समावेश असल्याची चर्चा आहे. तर कॉंग्रेसचे नवनिर्वाचित कार्याध्यक्ष विश्वजित कदम यांनी पक्ष प्रवेशाची शक्यता व चर्चा तथ्यहीन असल्याचे म्हंटले आहे. तर काँग्रेस-राष्ट्रवादीचे अनेक आमदार संपर्कात असून त्यातील काही जण याच आठवड्यात राजीनामा देतील असा दावा भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला होता. 2019 लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला पहिला धक्का माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी दिला. माढा लोकसभेच्या जागेवर सुरू झालेल्या राजकारणानंतर मोहिते पाटलांनी राष्ट्रवादी सोडली आहे. त्यांच्यामागे काही आमदार देखील आता विधानसभा निवडणुकीत देखील पक्ष सोडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे, बार्शीचे आमदार दिलीप सोपल आणि उल्हासनागरच्या ज्योती कलानी भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. चेतनसिंह केदार राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक तालुकाध्यक्ष व विद्यमान नगरसेवक आहेत. पंढरपूर येथील भाजपा मेळाव्यात चेतनसिंह केदार राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश करतील. माजी उपनगराध्यक्ष म्हणुन काम पाहिलेले चेतनसिंह केदार भाजपवासी होत असल्याने सांगोला तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नुकसान होणार आहे. तर अहमदनगरचे आमदार संग्राम जगताप शिवसेनेच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. संग्राम जगताप यांनी दक्षिण नगर मधून राष्ट्रवादी काँग्रेससाठी निवडणूक लढली होती पण महापालिका निवडणुकीत नगरसेवकांनी भाजपला केलेली मदत त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे संशयाने पाहिले जाते आहे. कोकणातील श्रीवर्धन मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार आणि खासदार सुनील तटकरे यांचे पुतणे अवधूत तटकरे देखील सेनेच्या मार्गवर असल्याची चर्चा आहे. 2014 विधानसभा निवडणुकीत अनेकांनी भाजप प्रवेश केला होता. 2019 विधानसभा निवडणुकीच्या वेळी देखील हाच ट्रेंड दिसण्याची शक्यता आहे. माढ्याचे राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार बबनदादा शिंदे व त्यांचे पुत्र रणजित शिंदे भाजपमध्ये जाण्यास इच्छुक आहेत. काँग्रेसचे अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिध्दाराम म्हेत्रे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. काँग्रेसचे पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार भारत भालके आगामी विधानसभेला भाजपच्या मार्फत शिवसेनेत जाण्याची शक्यता आहे. 2004 साली शिवसेनेच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढवली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे मोहोळ विधानसभेचे आमदार रमेश कदम आगामी विधानसभेसाठी शिवसेनेतून लढण्यास इच्छुक असल्याची माहिती आहे. नवी मुंबई महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे 13 नगरसेवक आणि काही महत्त्वाचे पदाधिकारी राष्ट्रवादीपक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये जाणार असल्याची चिन्हे आहेत. तसे झाले तर माजी मंत्री आणि पक्षाचे नेते गणेश नाईक यांच्यासाठी मोठा धक्का बसणार आहे. येत्या 15 ऑगस्ट पूर्वी हे सर्वजण भाजपमध्ये जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन विविध पक्षीय आमदारांमध्ये राजीनामा दिलेले सर्व आमदार भाजपमध्ये प्रवेशास उत्सुक असल्याची चर्चा आहे. यामध्ये शिवसेनेचे कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव, राष्ट्रवादीचे वैजापूरचे आमदार भाऊसाहेब चिकटगावकर आणि इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांचा समावेश आहे.

  भारत भालके (काँग्रेस) पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार – भाजप व्हाया शिवसेना पक्ष प्रवेशाच्या वाटेवर
 सिध्दाराम म्हेत्रे (काँग्रेस) अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार – भाजप पक्ष प्रवेशाच्या वाटेवर
 जयकुमार गोरे (काँग्रेस) माण विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार – भाजप पक्ष प्रवेशाच्या वाटेवर
 रणजित शिंदे (राष्ट्रवादी) माढा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार पुत्र – भाजप पक्ष प्रवेशाच्या वाटेवर
 बबनदादा शिंदे (राष्ट्रवादी) माढा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार – भाजप पक्ष प्रवेशाच्या वाटेवर
 दिलीप सोपल (राष्ट्रवादी) बार्शी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार – भाजप पक्ष प्रवेशाच्या वाटेवर
 ज्योती कलानी (राष्ट्रवादी) उल्हासनागर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार – भाजप पक्ष प्रवेशाच्या वाटेवर
 संग्राम जगताप (राष्ट्रवादी) अहमदनगर द. विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार – भाजप व्हाया शिवसेना पक्ष प्रवेशाच्या वाटेवर
 अवधूत तटकरे (राष्ट्रवादी) श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघ, खासदार सुनील तटकरे यांचे पुतणे – शिवसेना पक्ष प्रवेशाच्या वाटेवर
 रमेश कदम (राष्ट्रवादी) मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार – शिवसेना पक्ष प्रवेशाच्या वाटेवर
 दत्तात्रय भरणे (राष्ट्रवादी) इंदापूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार (उमेदवारी डावलल्यास) – भाजप पक्ष प्रवेशाच्या वाटेवर
 प्रदीप कंद (राष्ट्रवादी) शिरूर विधानसभा मतदारसंघातील विद्यमान जि.प. पदाधिकारी (उमेदवारी डावलल्यास) – भाजप प्रवेशाच्या वाटेवर
 चेतनसिंह केदार (राष्ट्रवादी) राष्ट्रवादीचे युवक तालुकाध्यक्ष व विद्यमान नगरसेवक आहेत – भाजप पक्ष प्रवेशाच्या वाटेवर

वरील सर्व काँग्रेस, राष्ट्रवादीमधील  विद्यमान 9 आमदारांसह अनेक विद्यमान व माजी पदाधिकारी भाजप-सेनेच्या वाटेवर आहेत. याबाबत स्थानिक पातळीवर राजकीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये चर्चा असून सोशल मीडियातून देखील त्यांच्या समर्थकांकडून आमचं ठरलंय असे संदेश व्हायरल केले जात आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुण्याला पुस्तकाची जागतिक राजधानी करणार-उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

पुणे महोत्सव खऱ्या अर्थाने भारतीय विचार, संवाद आणि संस्कृतीचा...

एक कोटी शेळ्या सोडण्याचा निर्णय हास्यास्पद:अजित पवारांनी फेटाळला वनमंत्र्यांचा प्रस्ताव

नागपूर-राज्यात बिबट्यांचा हैदोस दिवसेंदिवस तीव्र होत चालला असून मानवी...

मुंबईत 36 दिवसांत 80 हून अधिक मुलं-मुली बेपत्ता:सरकार आकडे लपवत आहे- सचिन अहिर यांचा आरोप

नागपूर -मुंबईमधून गेल्या 36 दिवसांमध्ये 80 हून अधिक मुलं-मुली...

एकनाथ शिंदे दोन महिन्यांत पुन्हा मुख्यमंत्री होणार:प्रकाश आंबेडकर यांनी वर्तवली शक्यता

मुंबई-राज्यातील महायुतीमध्ये झालेल्या अंतर्गत कलहाच्या आणि नाराजीच्या नाट्यानंतर वंचित...