पुणे
शिवसेना व नवनिर्माण आयोजित दीपावली संगीत महोत्सवात यंदा पोलिसांच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्यासाठी पोलीस अधिकारी स्व. उदयभाऊ मोरे यांच्या स्मरणार्थ पोलीस दलातील अधिकारी- कर्मचाऱ्यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
मॉडेल कॉलनीतील चित्तरंजन वाटिका येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही माजी नगरसेवक राजू पवार यांनी आयोजित केलेल्या दीपावली संगीत महोत्सवाला नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. रितेश व रजनीश मिश्रा यांचे शास्त्रीय गायन तर देबूप्रिया व सुचिस्मिता यांचे बासरी वादन, ताका हिरो यांचे संतूर वादनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. डॉ. कल्याणी बोन्द्रे यांच्या शास्त्रीय गायनाला रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली. राधा मंगेशकर, जयदीप वैद्य, राजेश दातार , राहुल घोरपडे ,अमर ओक यांनी भावसंगीत -सुगम संगीतामध्ये रसिकांना मग्न केले. या महोत्सवात धडाडीचे पोलीस अधिकारी स्व.उदयभाऊ मोरे यांच्या स्मरणार्थ आणि पोलीस हुतात्मा दिवसानिमित्त सहायक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे , सहायक
विक्रीकर आयुक्त नलावडे, राजा मोरे यांच्या हस्ते सुनील पवार , शैलेश जगताप, रविंद्र साबळे या पोलीस बांधवांचा
सन्मानचिन्ह देऊन विशेष गौरव करण्यात आला. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख राम गावडे , माजी नगरसेवक व संयोजक राजू पवार, दीपक आल्हाट, किशोर जोशी,विवेक जोशी, सचिन भालेराव, आशिष अंबुडकर , शशिकांत शिंदे, , संदीप पवार, , सचिन नवघणे ,सुनील जाधव आदींसह मान्यवर उपस्थित होते.