पुणे- पुणे येथील उच्चदाब विजजोडणी असलेल्या जम्बो कोविड सेंटरचा किंवा अन्य कोणत्याही कोविड रुग्णालयाचा वीजपुरवठा महावितरणकडून खंडित करण्यात आलेला नाही.
वस्तुस्थिती अशी आहे की सीओईपी परिसरात दिपाली डिझाईनर यांचे कार्यालय आहे. सहा लाखांची थकबाकी असल्याने त्यांचा वीजपुरवठा खंडीत करण्यात आला होता. मात्र महानगरपालिकेशी संबंधित कोविड कंट्रोल रुमचे कंत्राट दीपाली डिझाईनर यांना देण्यात आले आहे, असे महापालिकेकडून कळविताच त्यांचा वीज पुरवठा तात्काळ जोडून देण्यात आला आहे.असा खुलासा महावितरण प्रसिद्ध केला आहे.
जम्बो कोविड सेंटरचा किंवा अन्य कोणत्याही कोविड रुग्णालयाचा वीजपुरवठा खंडित करण्यात आलेला नाही- महावितरण
Date:

