गोकूळनगर, टिळेकरनगर, पॅरामाऊंट गार्डनमध्ये वीजपुरवठा सुरळीत

Date:

पुणे, दि. २१ ऑक्टोबर २०२२: कात्रज कोंढवा परिसरात मुसळधार पाऊस व साचलेल्या पाण्यामुळे २२ केव्हीच्या दोन भूमिगत वीजवाहिन्यांमध्ये गुरुवारी (दि. २०) सायंकाळी बिघाड झाला. या दोन्ही भूमिगत वाहिन्यांमध्ये एकमेकांना पर्यायी स्वरुपात वीजपुरवठा करण्याची सोय आहे. मात्र दोन्ही वाहिन्या नादुरुस्त असल्याने तांत्रिक कामे करून इतर ठिकाणाहून वीजपुरवठा सुरु करण्यात आला. तथापि भारव्यवस्थापन शक्य नसल्याने गोकूळनगर, शिवशंभो गल्ली क्र. २ ते ४, पॅरामाऊंट गार्डनच्या सोसायट्या, राजमाता कॉलनी, टिळेकरनगर, समर्थनगर या परिसरातील सुमारे २२०० ग्राहकांचा वीजपुरवठा शुक्रवारी (दि. २१) सकाळी ८.३० वाजता सुरळीत करण्यात आला.

याबाबत माहिती अशी की, महावितरणच्या राजीव गांधी २२/२२ केव्ही उपकेंद्रातून निघणाऱ्या कात्रज-कोंढवा २२ केव्ही भूमिगत वाहिनीमध्ये कात्रज स्मशानभूमीजवळ ओढ्यानजीक साचलेल्या पाण्यामुळे काल सायंकाळी ५.३० च्या सुमारास दोन ठिकाणी बिघाड झाला. त्याच सुमारास २२/२२ आकृती उपकेंद्रातून निघणाऱ्या इस्कॉन २२ केव्ही भूमिगत वाहिनीमध्ये देखील साचलेल्या पाण्यामुळे आर्द्रता निर्माण होऊन दोन ठिकाणी बिघाड झाला. या दोन्ही वीजवाहिन्यांमध्ये एकमेकांना पर्यायी वीजपुरवठा करण्याची सोय आहे. मात्र दोन्ही वाहिन्या नादुरुस्त झाल्यामुळे महावितरणचे अभियंते व कर्मचारी यांनी युद्धपातळीवर तांत्रिक कामे करून वीजपुरवठ्याची पर्यायी सोय केली. यामध्ये तासाभरात कात्रज-कोंढवा २२ केव्ही वाहिनीवरील सर्व परिसराचा वीजपुरवठा भिलारेवाडी वीजवाहिनीद्वारे सुरु करण्यात आला.

तसेच नादुरुस्त झालेल्या इस्कॉन २२ केव्ही या दुसऱ्या भूमिगत वाहिनीचा ६० टक्के वीजपुरवठा लेकटाऊन उपकेंद्र व इतर ठिकाणाहून सुरु करण्यात आला. मात्र गोकूळनगर, शिवशंभो गल्ली क्र. २ ते ४, पॅरामाऊंट गार्डन, पॅरामाऊंट इरोस, माऊलीनगर, समर्थनगर, राजमाता कॉलनी, आंबेडकरनगर, टिळेकरनगर या परिसरातील सुमारे २२०० ग्राहकांचा वीजपुरवठा सुरु होऊ शकला नाही. महावितरणचे अभियंता व कर्मचाऱ्यांनी रात्रभर दुरुस्तीचे काम करून आज सकाळी ८.३० वाजता या परिसरातील वीजपुरवठा सुरळीत केला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बनावट आधारकार्डद्वारे बोगस मतदान, 6 जणांवर गुन्हा:तिघांचे झाले मतदान, तर तिघांच्या तपासणीत फुटले बिंग

पुणे-पुणे जिल्हा परिषद निवडणुकीत बोगस मतदान केल्याप्रकरणी सहा जणांविरुद्ध...