पूनावाला फिनकॉर्पचा नफा ७१ टक्क्यांनी वाढून १६३ कोटी रुपयांवर…

Date:

पुणे, – पूनावाला फिनकॉर्प लिमिटेड या एनबीएफसीच्या संचालक मंडळाने ३० सप्टेंबर २०२२ रोजी अनऑडिटेड आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. पूनावाला फिनकॉर्प ही ग्राहक आणि एमएसएमई फायनान्सवर लक्ष केंद्रित करणारी एनबीएफसी आहे.

महत्त्वाची वैशिष्ट्ये – आर्थिक वर्ष २३ ची दुसरी तिमाही (एकत्रित):

•       व्यवस्थापनाअंतर्गत मालमत्ता (एएयूएम) वार्षिक पातळीवर २२ टक्क्यांनी आणि तिमाही पातळीवर ५ टक्क्यांनी वाढून १८,५६० कोटी रुपयांवर.

•       वितरण वार्षिक पातळीवर ४४ टक्क्यांनी आणि तिमाही पातळीवर ८ टक्क्यांनी वाढून ३७२१ कोटी रुपयांवर

•       सर्वोच्च करोत्तर नफा वार्षिक पातळीवर ७०.८ टक्क्यांनी आणि तिमाही पातळीवर १५.८ टक्क्यांनी वाढून १६३ कोटी रुपयांवर

•       सर्वोच्च आरओए वार्षिक पातळीवर १०२ बीपीएसने वाढून ३.६ टक्क्यांवर आणि तिमाही पातळीवर २४ बीपीएसची वाढ

•       एनआयआय वार्षिक पातळीवर ३३ टक्क्यांनी आणि तिमाही पातळीवर १२ टक्क्यांनी वाढून ४४६ कोटी रुपयांवर

•       एनआयएम वार्षिक पातळीवर ७७ बीपीएसने आणि तिमाही पातळीवर ३५ बीपीएसने वाढून ९.८ टक्क्यांवर

•       एकूण एनपीए वार्षिक पातळीवर २५९ बीपीएसने आणि तिमाही पातळीवर ६७ बीपीएसने कमी होऊन १.५२ टक्क्यांवर, तर निव्वळ एनपीए वार्षिक पातळीवर ११८ बीपीएस आणि तिमाही पातळीवर १३ बीपीएसने कमी होऊन ०.८३ टक्क्यांवर. आरबीआय सर्क्युलरद्वारे जारी केलेल्या एनपीएची सुधारित व्याख्येशी सुसंगत राहिल्यावरही घट. गेल्या ३८ तिमाहींमधील ही सर्वोत्तम मालमत्ता दर्जा आकडेवारी.

•       डीडीपी (डायरेक्ट डिजिटल प्रोग्रॅम) मिक्स आर्थिक वर्ष २२ च्या चौथ्या तिमाहीतील १७.५ टक्के आणि पहिल्या तिमाहीतील ३४ टक्क्यांवरून वाढून दुसऱ्या तिमाहीत ४७ टक्क्यांवर

•       केयरतर्फे दीर्घकालीन रेटिंग अद्ययावत – ‘AAA/Stable’.

•       ३० सप्टेंबर २०२२ रोजी लिक्विडीटी ४८१२ कोटी रुपयांवर

•       स्वतंत्र कॅपिटल अडिक्वेसी गुणोत्तर ३० सप्टेंबर २०२२ रोजी ४४.९ टक्क्यांवर.

•       दमदार एएलएम व्यवस्थापन, लायबिलिटीजचे विभागीकरण, कर्ज घेण्याच्या खर्चावरील व्याजदरात नुकत्याच झालेल्या वाढीचा परिणाम हळूहळू जाणवेल.

पूनावाला फिनकॉर्पच्या कामगिरीविषयी व्यवस्थापकीय संचालक सीए अभय भुतडा म्हणाले, ‘दुसरी तिमाही वेगळे धोरण आणि गुणवत्तापूर्ण अमलजावणीमुळे फलदायी ठरली. या तिमाहीदरम्यान व्यावसायिक वाढ, सुधारित पत दर्जा आणि नफा अशी सर्वच आघाड्यांवर चांगली कामगिरी पाहायला मिळाली. या तिमाहीत आतापर्यंतचे सर्वाधिक वितरण, ग्राहक संपादन, गेल्या ३८ तिमाहींमधील सर्वात कमी जीएनपीए आणि एनएनपीए, सर्वोच्च करोत्तर नफा आणि आरओए पाहायला मिळाला. यामुळे उर्वरित कालावधीतही चांगली कामगिरी झाली.’

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुण्याच्या महापौरपदी मंजुषा नागपुरे, उपमहापौरपदी परशुराम वाडेकर

पुणे :महापालिकेत आज सोमवारी महापालिकेच्या सभागृहात महापौर आणि उपमहापौर...

बनावट आधारकार्डद्वारे बोगस मतदान, 6 जणांवर गुन्हा:तिघांचे झाले मतदान, तर तिघांच्या तपासणीत फुटले बिंग

पुणे-पुणे जिल्हा परिषद निवडणुकीत बोगस मतदान केल्याप्रकरणी सहा जणांविरुद्ध...