पुणे : पूना क्लबच्या वतीने पूना क्लब प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा पूना क्लब येथे दिनांक ७ ते १२ मार्च दरम्यान होणार आहे. जेट सिंथेसिस, देसाई ब्रदर्स, फिनलॅंड इंटरनॅशनल स्कूल हे स्पर्धेचे मुख्य प्रायोजक तर ब्रिहन नॅचरल प्राॅडक्टस हे सहयोगी प्रायोजक आहेत. अशी माहिती स्पर्धा समितीचे अध्यक्ष शशांक हळबे यांनी दिली.
स्पर्धेचे यंदा ८ वे वर्ष आहे. क्लबमधील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी ही स्पर्धा आयोजित केली जाते. स्पर्धेचे उद्घाटन सोमवार, दिनांक ७ मार्च रोजी सायंकाळी ४ वाजता होणार असून यावेळी पूना क्लबचे अध्यक्ष नितीन देसाई, उपाध्यक्ष सुनील हांडा, अमेय कुलकर्णी, मुख्य प्रायोजक राकेश नवाणी, तारीक पारवानी, उमेश पिल्लई,रणजित पांडे उपस्थित राहणार आहेत.
स्पर्धेत क्लबमधील १२ ते ५५ वयोगटातील सदस्य सहभागी होणार आहे. या खेळाडूंची लिलावाद्वारे विभागणी करण्यात आली आहे. अर्जून मोटाडू या खेळाडूला लिलावात सर्वाधिक बोली लागली. त्याला टायगर्स संघाने ७ हजार ८०० रुपये बोली लावून संघात घेतले.
शशांक हळबे म्हणाले, प्रत्येक संघात १२ ते १४ खेळाडू असणार आहेत. यातील ९ खेळाडू मैदानात असतील. ही स्पर्धा साखळी आणि बाद फेरी स्वरुपात होणार आहे. प्रत्येक सामना ६ षटकांचा असणार आहे. स्पर्धेत दहा संघ सहभागी होणार असून, या संघांची दोन गटांत विभागणी करण्यात आली आहे. या दोन गटांतून चार संघ उपांत्य फेरीत दाखल होतील आणि त्यानंतर अंतिम सामना १२ मार्चला खेळला जाणार आहे.
स्पर्धेतील विजेत्या संघाला ट्रॉफी देऊन गौरविण्यात येणार आहे. त्याचबरोबर स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू, सर्वोत्तम यष्टिरक्षक, सर्वोत्तम फलंदाज, सर्वोत्तम गोलंदाज यांनाही वैयक्तिक पारितोषिके देण्यात येणार आहे. आॅल स्टार्स, जॅग्वार्स, जेटस्, किंग्ज, माॅव्हरिक, सेलर्स, टायगर्स, टायफून्स, वेलकिन ईगल्स, वाॅरियर्स हे संघ स्पर्धेत सहभागी झाले आहेत.
पूना क्लब प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा ७ मार्चपासून
Date:

