राजकारण म्हणजे मिमिक्री नाही,जॉनी लिव्हर असताना यांना कशाला पाहू -संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला

Date:

दुसऱ्या नेत्यांचे आवाज किती काळ काढणार ?

मुंबई- राजकारण म्हणजे मिमिक्री नाही, असा खोचक टोला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मनसेप्रमुख राज ठाकरेंना लगावला आहे.

तसेच, मिमिक्री पाहायचीच असेल तर आम्ही ओरिजनल जॉनी लिव्हरची मिमिक्री पाहू. तुमची का पाहू, अशी टीका राऊतांनी केली. काल मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली होती. त्याला संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिले.राज ठाकरेंना उद्देशून संजय राऊत म्हणाले, केवळ मिमिक्री करून, आमच्यावर टीका करून किती काळ राजकारण करणार आहात. हे आता खूप झाल. तुम्ही आता बऱ्याच वेळापासून राजकारणात आहात. केवळ टीका करण्यापेक्षा राजकारणात काही तरी विधायक काम करून दाखवा. दुसऱ्या नेत्यांचे आवाज किती काळ काढणार. संपूर्ण महाराष्ट्र तुम्हाला पाहत आहे.

4 दिवस राहुल गांधींसारखे चालून दाखवा

राज ठाकरे यांनी काल भाषणात काँग्रेस नेते राहुल गांधी यांची मिमिक्री करून त्यांच्यावर टीका केली होती. यांचा उल्लेख करून राऊत म्हणाले, भारत जोडो यात्रेसाठी राहुल गांधी प्रचंड कष्ट घेत आहेत. ते जेवढे कष्ट घेत आहेत, तेवढे कष्ट तुम्ही चार दिवस तरी घेऊन दाखवा. तसेच, उद्धव ठाकरे आता बाहेर पडले, असे म्हणणाऱ्यांनी त्यांची नुकतीच झालेली बुलढाण्यातील सभा पाहायला हवी होती. ठाकरेंचे स्वागत करायला संपूर्ण बुलढाणा रस्त्यावर उतरला होता.

छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे राज्यपालांची हकालपट्टी करावी, अन्यथा शिवसेना रस्त्यावर उतरेल, असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला होता. त्यांचा अल्टीमेटम आता संपला आहे. याबाबत राऊत म्हणाले, राज्यपालांविरोधात अ‌ॅक्शन प्लॅन बनवण्याचे काम सुरू आहे. राज्यपालांविरोधात महाविकास आघाडीत एकजूट आहे. उद्धव ठाकरे मविआताल इतर नेत्यांशी बोलून लवकरच याबाबत माहिती देतील.

संजय राऊत म्हणाले, भाजपच्या आराध्य दैवतांकडून महाराष्ट्रातील आराध्य दैवतांचा अपमान होत आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी हे भाजपचे आराध्य दैवत आहेत. त्यामुळे शिवरायांच्या अपमानाचा विषय आपण नेहमीच्या राजकारणाने बाजूला करू, असे भाजपला वाटत असेल तर तो त्यांचा गैरसमज आहे. कोणत्याही क्षणी आम्ही राज्यपालांविरोधात रस्त्यावर उतरू, असा इशारा राऊतांनी दिला

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मोदी मजा करत आहेत, परदेशात जात आहेत..त्यांनी अशी कोणती क्रांती केली की, लोक त्यांच्यावर हल्ला करतील

नवी दिल्ली- लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मोदींसोबत संसदेत...

मुंबईत राष्ट्रवादी शरद पवार गटाचा महायुतीला पाठिंबा, 11 फेब्रुवारीला नव्या महापौरांची निवडणूक

मुंबई- महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम अखेर जाहीर झाला आहे....