शेंडी – जाणव्याचे हिंदुत्व मान्य नाही,सहा वर्षांच्या मुलीची चौकशी करता,हे तुमचे हिंदुत्व आहे काय? उद्धव ठाकरेंचे प्रहार

Date:

मालेगाव – मी हिंदुत्वापासून लांब झालो अशी एकतरी घटना दाखवा. आम्ही आमच्या मर्यादा सांभाळतो. शेंडी – जाणव्यांचे हिंदुत्व आम्हाला मान्य नाही. जे माझे आजोबा, वडील बोलायचे तेच मी बोलतो. अनिल देशमुखांना आत टाकले, त्यांच्या सहा वर्षांच्या मुलीची चौकशी करता. लालूप्रसाद यादव यांच्या गर्भवती सुनेची ती बेशुद्ध पडेपर्यंत चौकशी करता. ताटकाळत ठेवता. घरात घुसता हेच तुमचे हिंदुत्व आहे काय? साधुूसंतांची शिकवण गेली कुठे आता भाजपमध्ये संधीसाधू आहेत.गद्दारांच्या हातात भगवा शोभत नाही. माझ्यावर प्रेम करणारा एक माणूस, शिवसैनिक तुम्ही तुमच्यासोबत नेऊ शकला नाही. पण तुमच्या कपाळावर गद्दार म्हणून शिक्का बसला. तो शिक्का आयुष्यभर पुसला जाणार नाही. जिथे जाल तिथे गद्दारीचा शिक्का दिसेलच असा घणाघात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांवर केला. ते आज मालेगाव येथील सभेत बोलत होते.

यासह मी मुख्यमंत्रीपदासाठी रडत नाही. जनतेच्या प्रश्नासाठी लढतो. कुटुंबातील माणसाप्रमाणे मी मुख्यमंत्री असताना जनतेने मला प्रेम दिले. मला वाटत नाही की, हे गद्दारांच्या वाटेला प्रेम येईल का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सरकारवर घणाघात केला.  

ज्यांचे स्वातंत्र्य मिळविण्यासाठी तिळमात्र सहभाग नाही अशांच्या हाती देश देऊन गुलामी ओढवून घेऊ नका –

“राहुल गांधींनी प्रश्न विचारला २० हजार कोटी रूपये कोणाचे? त्यावरती भाजपाकडे उत्तर नाही आहे. हिंडेनबर्ग हजारो कोटी रूपयांचे घोटाळे काढत आहे. पण, भाजपा त्याला किंमतही देत नाही. पंतप्रधान उत्तरही देत नाही. आमच्याकडे साध्या-साध्या लोकांच्या पाठीमागे ईडी, सीबीआय लावून घोटाळे काढण्यात येत आहेत.फक्त राहुल गांधींना एक सांगायचं आहे, तुम्ही कन्याकुमारी ते काश्मीर चालला. संजय राऊत आणि आम्हीही तुमच्याबरोबर होतो. ही लढाई लोकशाहीची आहे. मात्र, राहुल गांधींना जाहीरपणे सांगत आहे, स्वातंत्र्यवीर सावरकर आमचं दैवत आहे. त्यांचा अपमान पटणारा नाही. लढायचं तर दैवतांचा अपमान सहन करणार नाही,” असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.ज्यांचे स्वातंत्र्य मिळविण्यासाठी तिळमात्र सहभाग नाही अशांच्या हाती देश देऊन गुलामी ओढवून घेऊ नका –

उद्धव ठाकरे म्हणाले, मी पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी लोक शपथ घेत आहेत. पण मी मुख्यमंत्री होण्यासाठी रडत नाही. लोकांच्या प्रश्नासाठी लढत आहे. जागरुक असल्यावर बोलायचे काय हा प्रश्न आहे. बऱ्याच वर्षांपासून मालेगावात आलो आहे. जगभर कोरोना होता. दोन ठिकाणी काळजाचा ठोका चुकला होता. एक मुंबई आणि दुसरा मालेगाव. माझे कर्तव्य आहे आणि मी घरात बसून सर्वांना सांगितले आणि तुम्ही ऐकले होते त्यामुळे धन्यवाद. मुख्यमंत्रीपद येते आणि जाते. पण कुटुंबातील माणसाप्रमाणे जनतेने मला प्रेम दिले. मला वाटत नाही की, हे गद्दारांच्या वाटेला प्रेम येईल का हा प्रश्न आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले, माझ्या शिवसेनेचे नाव, प्रेम चोरले पण माझी जीवाभावाची माणसे चोरू शकत नाही. सत्तेकडे सर्वजण जातात पण मर्दगडी अद्वैय हे सत्तेतून सत्ता नसलेल्यांत आलेला आहे. विश्वास तुटला की, तुटला. एकमेव धागा जो संयुक्त महाराष्ट्राचा भाऊसाहेब आणि प्रबोधनकारांचा आहे तोच धागा महत्वाचा आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले, कोण म्हणते कांद्याला भाव नाही. गेल्या वर्षी एक कांदा खरेदी झाला. किती खोक्याला कांदा खरेदी झाला. अडीच वर्षे आपले सरकार होते ते शेतकऱ्यांच्या पाठीमागे ठाम होते की, नाही ते सांगा. कर्जमुक्तीची योजना राबवली होती. द्राक्ष बागायतदारांना फायदा मिळाला नाही पण उर्वरीत शेतकऱ्यांना मिळाली की नाही. शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्यायची. पन्नास हजार रुपये प्रोत्साहन देणार होतो पण गद्दारी झाली.

उद्धव ठाकरे म्हणाले, मुख्यमंत्री हेलिकाॅप्टरने शेतात जातो. विजेचा पत्ता नाही, शेतीला भाव नाही. पण मुख्यमंत्र्यांच्या गळ्यात दोरी आणि घंटा बांधलीय. कृषिमंत्री महिलांना शिवीगाळ करतात. सुप्रीया सुळेंना शिवी दिली. तरीही सीएम कृषिमंत्र्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात. द्राक्ष नासली. अवकाळीचा फटका बसला. तरीही केंद्रीय कृषिमंत्री तोमर म्हणतात, अवकाळीचा फटका विशेष काही नाही.

उद्धव ठाकरे म्हणाले, शेतकऱ्यांना एकमागून एक फटका बसत आहे. मविआने पंचनामे तत्परतेने करीत होते. आताचे सरकार चांगले आहे का? का मी सभा घेतोय. सत्ता गेल्याचे दुःख नाही. चांगले काम करणारे सरकार गद्दारी करून पाडले आणि निर्लज्जासारखे भगवा हातात घेवून ते नाचत आहेत. गद्दारांच्या हातात भगवा शोभत नाही. माझ्यावर प्रेम करणारा एक माणूस, शिवसैनिक तुम्ही तुमच्यासोबत नेऊ शकला नाही. पण तुमच्या कपाळावर गद्दार म्हणून शिक्का बसला. तो शिक्का आयुष्यभर पुसला जाणार नाही. जिथे जाल तिथे गद्दारीचा शिक्का दिसेलच.

उद्धव ठाकरे म्हणाले, महाराष्ट्राची अवहेलना आणखी किती करणार, उद्योगधंदेही घालवले. उद्योग बाहेर नेले. मुंबईचे महत्व मारून टाकत आहेत. दिल्लीने डोळे वटारले तर….? सांगायला नको. एक तर निवडणूक आयोगाचे गांडूळ झाले आहे. निवडणूक आयोगाच्या डोळ्यात मोतीबिंदू झाले नसतील तर मालेगावची सभा बघा. निवडणूक आयुक्त अन्यायाने वागले.

शिवसेना मिंध्यांच्या वडीलांची नाही,माझ्या वडिलांची …त्यांना त्यांच्या वडिलांचे नाव लावायला लाज वाटते काय ?

उद्धव ठाकरे म्हणाले, शिवसेना माझ्या वडीलांनी स्थापन केली, मिंध्यांच्या वडीलांनी नाही. त्यांना स्वःतच्या वडीलांचे नाव घ्यायला लाज वाटती त्यामुळे ते माझ्या वडीलांचे नाव घेता. माझ्या वडीलांनी उभारलेली शिवसेना चोरता. आज देशात एकूण जे वातावरण चालले ते बघितल्यानंतर केंद्र सरकार न्यायालयालाही बटीक बनवण्याचा प्रयत्न करीत होती. पण न्यायालयात रामशास्त्री बाण्याचे न्यायमूर्ती तिथे बसले आहेत. ज्या क्षणी न्यायालयातील रामशास्त्री बाणा संपेल. त्यादिवशी आपल्या लोकशाहीची श्रद्धांजली वाहण्याची सभा आपल्याला घ्यावी लागेल.उद्धव ठाकरे म्हणाले, चंद्रकांत पाटील बरेच दिवस मास्क घालून फिरत होते. ते प्रदेशाध्यक्ष असताना ते म्हणाले होते की, सत्तांतर झाले तेव्हा हृदयावर दगड ठेवून मिंध्यांना घेतले. मग आताचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी सांगितले की, आम्ही मिंधे गटाला 48 जागा देणार मी म्हणतो तुमच्या नावासारखे 52 जागा तरी द्या.

हिम्मत असेल तर निवडणुका घ्या आणि मोदींच्या नावाने मते माग ,बाळासाहेबांच्या नावाने नाही -ठाकरेंचे खुले आव्हान

उद्धव ठाकरे म्हणाले, मी भाजपला प्रश्न विचारतो की, ते मिंध्यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढणार का? जर भाजपला असे वाटत असेल की, आपण ठाकरेंपासून शिवसेना तोडू शकतो, तुमचे बावन काय एकशेबावनकुळं खाली उतरले तरीही ठाकरेंची शिवसेना संपवू शकणार नाही. निवडणुका घ्या, मी म्हणतो तुम्ही मोदींच्या आणि मी माझ्या वडीलांच्या नावाने मतं मागतो बघू कोण जिंकते. अजूनही तुम्हाला माझ्या वडीलांचे नाव वापरावे लागते. ज्या शिवसेनेने तुम्हाला जन्म दिला त्या शिवसेनेच्या आईच्या अंगावर तुम्ही वार केला.उद्धव ठाकरे म्हणाले, विरोधी पक्षातील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करून त्यांना पक्षात त्यांनी घेतले आहे. आमच्याकडे निरमा पावडर आहे. भ्रष्ट लोक धुतले की, स्वच्छ होतात हे भाजपचे एक आमदार विधानपरिषदेत बोलले. मी म्हणतो त्यांनी पक्षाचे नाव बदलावे. भ्रष्ट माणसे ते सत्तेसाठी पक्षात घेत आहेत. भाजप म्हणजे भ्रष्ट्र झालेला पक्ष.

उद्धव ठाकरे म्हणाले, आज भाजपमध्ये काही चांगली लोक आहेत. पण त्यांच्या पक्षात भ्रष्टाचारी बसले आहेत. त्यांच्या पक्षात तुमच्यासारखी स्वच्छ माणसे कशी राहू शकतात. भाजपचे काही नेते चारीत्र्यहनन करतात. कुणाच्या मुलावर, पत्नीवर आरोप करतात पण यांच्या नेत्यावर टीका केली तर भारताचा अपमान एवढा शुद्र माझा भारत नाही. मोदींवर टीका केली तर भारताचा अपमान. घराघरात पोलिस घुसतात, अटक करतात. जर आमच्या कुटुंबियांच्या बदनामीचा प्रयत्न थांबवला नाही तर तुमच्या घरातील लागेबांधे आम्ही काढल्याशिवाय राहणार नाही.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘भाजपा-शिवसेना पुणे महापालिका एकत्र लढणार’

शिवसेनेसोबत बैठकीनंतर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती पुणे, ...

काँग्रेसमध्ये इनकमिंग जोरात, मिरा भाईंदरमध्ये वेंचर मेंडोंसा व तारेन मेंडोंसा यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश.

भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका, महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसला विजयी...

इंद्रायणी आणि पवना नद्या प्रदूषणमुक्त करण्यासाठी 826.62 कोटींचा मेगा आराखडा!

इंद्रायणी नदी परिसरातील देहू–आळंदीसह ३० गावे आणि पवना नदी...

प्रज्ञा सातव राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या व पैशाच्या जोरावर फोडाफोडीचे भाजपाचे गलिच्छ राजकारण: नाना पटोले

‘काँग्रेसमुक्त’ भारत करणाचे स्वप्न पाहणारा भाजपाच ‘काँग्रेसयुक्त’ झाला, काँग्रेस...