पुणे- मी काही गुन्हेगार नाही, केवळ राजकीय षडयंत्राने मला गुन्हेगारीत गोवले गेले,मी चांगल्या मार्गावर चांगले काम करू नये काय ? असा सवाल करून पप्पू घोलप यांनी आपणास भाजपच विकास करू शकेल असे वाटते म्हणून आपण भाजपा तर्फेच निवडणूक लढविणार असल्याचे आज येथे स्पष्ट केले.
काही दिवसांपूर्वी खासदार संजय काकडे यांच्या सहाय्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून घोलप याने भाजप पक्षप्रवेश केल्यावरून मोठा गदारोळ उठला होता . या पार्श्वभूमीवर घोलप यांनी आज सांगितले कि , यापूर्वीही मी खडकवासला विधानसभा मतदार संघात आमदार भीमराव तापकीर यांचा प्रचार केला होता. तेव्हा कोणी मला गुन्हेगार म्हटले नाही . मला चांगल्या मार्गावर चांगले काम करून दाखवायचे आहे ,ते मी सामाजिक कार्यात नेहमी पुढाकार घेवून करत आलो आहे , भाजप हाच एकमेव पक्ष आहे कि जो या परिसराचा सर्वांगीण विकास करू शकेल , त्यामुळे मी भाजप देईल ती जबाबदारी स्वीकारून येथे काम करील .. …. पहा आणि ऐका .. नेमके घोलप यांनी काय म्हटले आहे .