कोविड नियम मोडणाऱ्यांवर कारवाईसाठी पोलीस पथक नेमावे-आमदार सिद्धार्थ शिरोळे

Date:

पुणे – कोविड साथ नियंत्रणासाठी शासनाने नागरिक आणि संस्थांसाठी नियम घालून दिलेले आहेत. त्यांचे पालन होत नसेल तर, त्यावर कारवाईसाठी पोलीस पथक नेमावे अशी सूचना आमदार शिरोळे यांनी आज (शुक्रवारी) कोविड आढावा बैठकीत केली.

कोविड साथीच्या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली त्यावेळी आमदार शिरोळे यांनी पोलीस पथक नेमावे आदी सूचना केल्या. कोविड साथीच्या काळात महाराष्ट्रातील पोलीसांवर कामाचा ताण वाढला. तरीही, त्यांनी चांगले काम केले. परंतु, साथीची तिसरी लाट रोखली जावी आणि साथ पूर्णपणे नियंत्रणात येण्यासाठी नागरिक आणि संस्था यांनी शासकीय नियमांचे काटेकोर पालन करावे अन्यथा ते न करणाऱ्यांवर कारवाई करावी. याकरिता स्वतंत्र पोलीस पथक नेमावे. हे पोलीस पथकही उत्तम काम करुन साथ नियंत्रणात मदतच करेल, असे आमदार शिरोळे यांनी सांगितले.

अनेक देशांमध्ये शाळा आणि महाविद्यालये सुरु करण्यात आली आहेत. त्या पद्धतीचा अभ्यास करुन महाराष्ट्रातही शाळा, कॉलेजेस सुरू करावीत, असे आमदार शिरोळे यांनी सुचविले. कोविड प्रतिबंधक लसीकरणासाठी वस्ती पातळीवर प्रबोधन केले जावे. पोस्ट कोविड रुग्णांचे प्रमाण वाढत असल्याने शासनाने त्यावर लक्ष केंद्रीत करावे. पुण्यात कोविड प्रतिबंधासाठी चाललेल्या सर्व पक्षीयांचे प्रयत्न आणि प्रशासनाचे कार्य याचे डॉक्युमेंटेशन करावे, अशा सूचनाही आमदार शिरोळे यांनी केल्या.

पावसाचे प्रमाण विचारात घेऊन
पाण्याचा विसर्ग करावा- आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे जिल्ह्यात ठिकठिकाणी पडलेल्या पावसाची माहिती घेऊन त्या अनुषंगाने धरणातून पाण्याचा विसर्ग करावा, अशी सूचना आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी कालवा समितीच्या बैठकीत आज ( शुक्रवारी )केली.

यंदा मोसमाच्या सुरुवातीला पाऊस चांगला झाला, पण सध्या बराच खंड पडला आहे. हे लक्षात घेऊन पाणी वाटपाचे नियोजन व्हावे आणि राज्य शासन – पुणे महापालिका प्रशासनाने संयुक्तपणे नियोजन केले पाहिजे, असे आमदार शिरोळे यांनी सांगितले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ओसवाल बिल्डरने जागा बळकावण्याचा प्रयत्न केल्याने ज्येष्ठ नागरिकाची आत्महत्या

पुणे: येथील बाणेर भागात विकसित करण्यासाठी दिलेल्या मिळकतीच्या व्यवहारात...

पुण्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमुळे आज मला मनुवादी वृत्तीच्या विरोधातील पुढचा लढा लढण्यासाठी अधिक बळ मिळाले:हर्षवर्धन सपकाळ

पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्यानंतर प्रथमच प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धनजी...

अजित पवार विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल २८ फेब्रुवारीपूर्वीच:केंद्रीय विमान वाहतूकमंत्री मुरलीधर मोहोळ

खासदार जनसंपर्क सेवा अभियानाला मोठा प्रतिसाद पुणे शहराला देशातील सर्वोत्तम...

शासकीय अधिकाऱ्यांनी चांगले वाचन करणे गरजेचे : पुलकुंडवार

दुसऱ्या राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलनाचा समारोप पुणे (प्रतिनिधी)...