
पुणे – तळेगाव दाभाडे येथील उद्योजक राष्ट्रवादीचे नगरसेवक बापू भेगडे यांच्या खूनाचा कट पुणे ग्रामीण पोलिसांनी उधळून लावला. या प्रकरणी पोलिसांनी बारा जणांना अटक केली असून, त्यांच्याकडून ३ पिस्तूल आणि ४ गावठी कट्टे, २३ जिवंत काडतुसे, कोयते, विविध कंपन्यांचे मोबाईल गुन्ह्यात वापलेली वाहने असा एकूण ६ लाख २० हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
मयुर उर्फ बंटी नामदेव टकले (रा. तळेगाव), जावेद उर्फ बाबा अब्दुल बागेवाडी (३८, रा. दत्तवाडी, आकुर्डी), अदित्य गणेश भेगडे (२०, रा. भेगडे आळी तळेगाव), सचिन सुरेश गरुड (२७, रा. भेगडे आळी), व्यंकटेश उर्फ नाना केशु राठोड (२१,रा. खंडोबा माळ तेळेगाव), शंकर सत्यनारायण भालके (२२, रा.तळेगाव), अहमद उर्फ शाहिद चाँद शेख (२१, रा. ढोरेवाडी, वडगाव मावळ), रोहन उर्फ सनी चंद्रकांत गरुड (२७, रा. शनिवार पेठ तळेगाव), अजिंक्य महादेव सरोदे (२३, रा. विप्रज फाटा तळेगाव), अविनाश उर्फ बुटल्या राजु भालेकर (२३, रा. सानेआळी, तळेगाव), निखील गुलाब घोडके (२६, रा. नगरपालीके जवळ तळेगाव), अखिलेश काळुराम गायकवाड (२३, रा. जांबे, ता. मुळशी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर हेमंत उर्फ सोन्या बाबुराव बडदे (रा. चिखली), बाळु पंढरीनाथ टकले (रा. टकलेवस्ती तळेगाव) हे दोघे पळून गेले आहेत. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार मयुर टकले याला देखील पोलिसांनी अटक करण्यात केली.
मयुर टकले याने नगरसेवक बापू भेगडे यांचा खून करण्याचा एक वर्षापूर्वी रचला होता. सर्व काही नियोजनपूर्वक करण्यात येत होते. या नियोजनामध्ये शाम रामचंद्र दाभाडे व बाळु टकले यांचा देखील प्रमुख सहभाग असून, शाम दाभाडे याने हत्यारे आणण्यासाठी २ लाखांची मदत केल्याची माहिती समोर आली आहे. तसेच शाम दाभाडे हा सराईत गुन्हेगार असून, मोका सारख्या गंभीर गुन्ह्यामध्ये बऱ्याच दिवसांपासून तो फरार होता.
बापू भेगडे यांच्या खूनानंतर कोर्ट कचेरीच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात पैशांची गरज भासेल, यासाठी त्यांनी आय.बी.पी पेट्रोल पंप लुटण्याची तयारी केली होती. रात्री सव्वानऊच्या सुमारास महामार्गावरील आय.बी.पी. पेट्रोल पंपाजवळ करण्यात आली. मयुर टकले आणि बापूसाहेब भेगडे यांच्यात पूर्वीपासून वाद आहेत.
ही कारवाई पुणे ग्रामिण पोलीस अधिक्षक डॉ. जय जाधव, अपर पोलीस अधिक्षक राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राम जाधव, सहायक पोलीस निरीक्षक सतिश होडगर, विनोद घोळवे, पोलीस उपनिरीक्षक खाडे, कर्मचारी विजय पाटील, शंकर जम, राजेंद्र मिरघे, सुनिल जावळे, दत्तात्रय बनसुडे, किरण आरुटे, मोरेश्वर इनामदार, राजेंद्र पुणेकर, डी.डी. लिमण, सुनिल बांदल, दत्तात्रय जगताप, गणेश महाडिक, रौफ इनामदार यांनी केली.

