पुणे-शेतकरी प्रश्नावरून पुणे रेल्वे स्थानकावर आंदोलन करायला गेलेल्या माजी गृहराज्यमंत्री आणि शहर कॉंग्रेस चे अध्यक्ष असलेल्या रमेश बागवे यांच्यासह कॉंग्रेसच्या नगरसेवकांना पोलीसिबळाला सामोरे जावे लागले .त्यांना यावेळी धक्का बुक्की करून दरवाजातूनच बाहेर ढकलून पोलीस ठाण्यात नेण्यात आले आणि इथे २५० जणांना अटक करून नंतर सोडून देण्यात आले .
शेतकऱ्यांच्या समस्या आणि आवाज दाबण्याचे काम भाजप सरकार करत असल्याचा आरोप काँग्रेस चे शहराध्यक्ष माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांनी येथे केला. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींना काल मध्यप्रदेश पोलिसांनी अटक केली होती. त्याच्या निषेधार्थ पुणे शहर काँग्रेसच्या वतीने पुणे रेल्वे स्थानकावर आंदोलनचा प्रयत्न करण्यात आला. त्यावेळी मायमराठी शी ते बोलत होते.अरविंदशिंदे,अविनाश बागवे,मोहन जोशी ,अजित दरेकर ,विश्वजित कदम ,कमल व्यवहारे, नीता राजपूत ,सतीश पवार,चंद्रशेखर कपोते आदी कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते .