‘टाइमलेस’ ही स्वतःची नवी ज्वेलरी लाईन सादर करण्यासाठी माधुरी दीक्षितचा ‘पीएनजी ज्वेलर्स’शी सहयोग
पुण्यात ‘जेडब्ल्यू मॅरियट’ हॉटेलमध्ये सुरु झालेल्या नव्या ‘पीएनजी बुटिक स्टोअर’मध्ये हिऱ्यांच्या अलंकारांची ‘टाइमलेस’ ज्वेलरी लाईन प्रदर्शित
पुणे : माधुरी दीक्षितचे सौंदर्य आणि प्रभाव यांचे वर्णन नेहमी ‘कालातीत’ (टाइमलेस) असे केले जाते. त्यामुळे माधुरीने स्वतःच्या संकल्पनेतून रचना केलेल्या हिऱ्यांच्या अलंकार संग्रहाला ‘टाइमलेस’ हे नाव देणे चपखल ठरते. ‘टाइमलेस’ ही आपली नवी ज्वेलरी लाईन सादर करण्यासाठी माधुरीने १८४ वर्षांचा अनुभव व परंपरा असलेल्या ‘पीएनजी ज्वेलर्स’ या ब्रँडशी सहयोग केला आहे. ‘पीएनजी ज्वेलर्स’ने हिऱ्यांच्या अलंकारांचा ‘टाइमलेस’ हा संग्रह प्रथम पुण्यातील आपल्या नव्या ‘पीएनजी बुटिक स्टोअर’मध्ये प्रदर्शित केला आहे. हॉटेल ‘जेडब्ल्यू मॅरियट’मध्ये सुरु झालेल्या या नव्या बुटिक स्टोअरमध्ये सौंदर्य व दिमाखाचे प्रतिक असलेल्या अभिनेत्री माधुरी दीक्षित-नेने हिने ‘पीएनजी ज्वेलर्स’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सौरभ गाडगीळ यांच्यासमवेत आज आपला हा खास ब्रँड सादर केला. ‘पीएनजी ज्वेलर्स’ हा ब्रँड शतकाहून अधिक काळ विश्वसनीयतेसाठी ख्यातनाम असून तेच वैशिष्ट्य त्याच्या ‘परंपरा अच्छाई की’ या श्रेयपंक्तिमध्ये (टॅगलाईन) अंतर्भूत आहे.
हे नवे आलीशान स्टोअर ५०० चौरस फुटांचे असून त्यातून रुबाब आणि कौशल्य प्रतीत होते. या ‘पीएनजी बुटिक स्टोअर’मध्ये माधुरी दीक्षितची ‘टाइमलेस’ ही खास ज्वेलरी लाईन, तसेच सर्वोत्तम हिरे अलंकार व डिझायनर्स कलेक्शन्स प्रदर्शित करण्यात आले आहेत, ज्यातून सामग्रीचा उच्च दर्जा आणि चोखंदळ ग्राहकांना अपेक्षित मूल्य यांचा प्रत्यय येतो. या स्टोअरमध्ये व्यक्तीगत आवडीनुसार उत्पादन मिळण्याची सोय असल्याने ते उच्चभ्रू ग्राहकांना त्यांच्या पसंतीचे विशिष्ट अलंकार खरेदी करण्याचा असाधारण अनुभव मिळवून देणारे आदर्श असे ‘वन स्टॉप शॉप’ आहे.
माधुरी दीक्षित ही ‘पीएनजी ज्वेलर्स’शी दीर्घकाळ संबंधित असून यावेळी प्रथमच ती स्वतःचा खास ‘टाइमलेस’ अलंकार संग्रह सादर करत आहे. अनोखे बारकावे आणि परिपूर्णता यामुळे हा संग्रह आगळा ठरला आहे. बुटिक स्टोअरच्या अभिनव संकल्पनेतून साकारलेला हा संग्रह लवकरच अन्य ७ शहरांतही उपलब्ध होणार आहे. हे बुटिक स्टोअर विशेषतः तरुण व फॅशन-प्रेरित खरेदीदारांसाठी असून तेथे विविध संवादात्मक वैशिष्ट्ये आहेत. ‘पीएनजी ज्वेलर्स’ ही कंपनी गेल्या १८४ वर्षांपासून अलंकार व्यवसायात असून उत्कृष्ट कारागिरी व नैपुण्याचा ठसा या जोरावर आता त्यांनी हिरे व्यवसायाकडेही लक्ष वळवले आहे. नव्या बुटिकमधील अलंकारांच्या विविध श्रेणी सादर करण्यात आल्या असून त्यांची किंमत एक लाख रुपयांपासून पुढे आहे.
‘टाइमलेस’ ही ज्वेलरी लाईन दिमाख व उच्च कारागिरीचे प्रतिक आहे. हा संग्रह आगळा ठरावा, या हेतूनेच तपशीलवार बारकाव्यांनिशी त्याची रचना करण्यात आली आहे. आधुनिकेतचा गाभा आणि अभिजात व राजेशाही रचनांचा संगम असलेल्या या अलंकारांतून एक परिपूर्ण स्त्री प्रतित होते. ही श्रेणी केवळ रसपूर्ण, बारकाव्यांनी समृद्ध व सूक्ष्म नसून बहुआयामीही आहे. ‘टाइमलेस’ ज्वेलरी लाईनमधून उत्कृष्टता व उदात्तता प्रतित होते, जी आधुनिक भारतीय स्त्रीला भावते आणि तिच्या व्यक्तीमत्वाशी तादात्म्य राखते. अन्य कोणतेही अलंकार संग्रह असे वैशिष्ट्य प्रकट करत नाहीत. आजीवन साथीची हमी देणाऱ्या अंगठ्या, कल्पक कारागिरीने घडवलेले नेकपिस आणि थक्क करणारे इयरड्रॉप्स अशा लोभस अलंकारांच्या जोरावर माधुरी दीक्षितचा हा ‘टाइमलेस’ संग्रह अलंकार निर्मिती व कलेसाठी नवी क्षितीजे निर्माण करत आहे.
चिरंतन सौंदर्याचे प्रतिक असलेली माधुरी दीक्षित यासंदर्भात म्हणाली, की मी ही ज्वेलरी लाईन निर्माण करण्याच्या कल्पनेवर गेली काही वर्षे विचार करत होते. त्या दरम्यान माझी दाजीकाका गाडगीळ यांच्याशी प्रथम भेट झाली आणि त्यांना मी माझे विचार सांगितले. दाजीकाकांचा प्रतिसाद अत्यंत प्रोत्साहक होता. या कल्पनेवर आपण सहयोग करावा, असे त्यांनी सौरभ गाडगीळ यांना सांगितले. आता ते स्वप्न साकार होत आहे. ‘पीएनजी’ ब्रँडशी सहयोगाने माझी स्वतःची ‘टाइमलेस’ ही ज्वेलरी लाईन सादर करताना मला अत्यंत अभिमान वाटत आहे. ‘टाइमलेस’मधून स्त्रीच्या व्यक्तीमत्वातील भावना, पैलू आणि विविध गुणांचा आविष्कार होतो. यातील प्रत्येक अलंकारामागे कहाणी असून ती खूप काही सांगून जाते. मार्क्विज कट हे तुमच्यातील कर्तबगार स्त्रीचे प्रतिक आहेत, टिअरड्रॉप हे प्रेम आणि आकांक्षेचे प्रतिक आहे, राऊंड कटमधून आईची माया व संगोपन प्रतित होते, ट्रिलियन कटमधून नर्तकीचा डौल आविष्कृत होतो, तर प्रिन्सेस कट हे महत्त्वाकांक्षी, आधुनिक स्त्रीचे प्रतिक आहे. माधुरीचे ‘टाइमलेस’ कलेक्शन प्रदर्शित करणारे ‘पीएनजी बुटिक’ हीसुद्धा अनोखी संकल्पना आहे. ते एकाचवेळी पारंपरिक आणि आधुनिक असून दोन्ही शब्दांतील सर्वोत्तम गुणांचे प्रतिनिधीत्व करते.
‘पीएनजी ज्वेलर्स’चे व्यवस्थापकीय संचालक सौरभ गाडगीळ म्हणाले, की ‘पीएनजी ज्वेलर्स’ अलंकारांचा रीटेल व्यवसाय आणि हिरे अलंकारांच्या सर्व पैलूंचा शोध घेत असून आम्हाला त्यात उत्कृष्टता प्राप्त करायची आहे. ग्राहकांना प्रीमियम ज्वेलरी आणि खरेदीसाठी उत्कृष्ट वातावरण देणे, हा माधुरी दीक्षितच्या ‘टाइमलेस’ ज्वेलरी लाईनमागील उद्देश आहे. बॉलिवूडची चिरंतन सौंदर्यवती माधुरी दीक्षित ही हिऱ्यांच्या कालातीत गुणधर्माचेच प्रतिक आहे. माधुरीने सादर केलेला ‘टाइमलेस’ संग्रह अप्रतिम असून आमच्या सहयोगाचा आम्हाला अभिमान वाटतो. आम्ही ‘टाइमलेस’ ज्वेलरी लाईनचे जागतिक परवानाधारक असून हा संग्रह प्रदर्शित करणारे ‘पीएनजी बुटिक’ हे पहिले स्टोअर आहे. हा खरोखरच खरेदीचा अत्युत्कृष्ट अनुभव ठरणार आहे. एक ब्रँड म्हणून आम्ही विस्ताराची भरारी घेत असून खरोखर उल्हसित झालो आहोत.
‘पीएनजी ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड’विषयी :
‘पीएनजी ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड’ हे सर्वाधिक नामवंत सराफांपैकी एक असून त्यांना सर्जनशीलतेतील उत्कृष्टतेची १८४ वर्षांची जुनी परंपरा आहे. या कंपनीने जगभरच्या ग्राहकांना सुखावह सेवा दिली असून स्त्रीला तिच्या सौंदर्याचा शोध घेण्यातही मदत केली आहे. प्रबळ दूरदृष्टी असलेल्या सौरभ गाडगीळ यांच्या नेतृत्वाखाली ‘पीएनजी ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड’ आधुनिक भारतीय नारीच्या अभिरुचीची पूर्तता करणारा ब्रँड निर्माण करत आहेत.