पीएमआरडीए च्या परवडणाऱ्या ३२ हजार घरांना मंजुरी,पहा कुठे केवढ्याला घर ..

Date:

पुणे: केंद्र शासनातर्फे केंद्रीय संनियंत्रण व मान्यता समितीच्या बैठकीत प्रधानमंत्री आवास योजनेच्या ३२ हजार ६२७ परवडणा-या घरांना मंजूरी देण्यात आली. त्यात पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीत आणखी ३० हजार १९१ सदनिका प्रस्तावित असून त्यातील २० हजार २०६ सदनिका प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत बांधणार आहेत.
महाराष्ट्रात राज्यातील परवडणा-या घरांसाठी नाविन्यपूर्ण प्रकल्प प्रधानमंत्री आवास योजनेच्या घटक 3 नुसार एमएमआरडीएमार्फत माण-महाळूंगे नगर रचना योजनेतील अत्यल्प उत्पन्न गटातील राखीव भूखंडावर १४ ठिकाणी सुमारे १३.३ हेक्टर क्षेत्रावर परवडणारी घरे बांधली जाणार आहेत. महाराष्ट्र गृह निर्माण विकास महामंडळ (महाहौसिंग)सोबत संयुक्त भागीदारी तत्त्वावर ही घरे बांधण्यास पीएमआरडीएला मान्यता मिळाली आहे.या माध्यमातून अत्यल्प उत्पन्न (ईडब्ल्यूएस)व अल्प उत्पन्न गटासाठी ६ हजार ५०३ परवडणा-या घरांची निर्मिती केली जाणार आहे.या योजनेमुळे माण-महाळुंगे परिसरातील लोकसंख्या १.५ लाखापर्यंत जाण्याची शक्यता आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेच्या घटक ४ नुसार भोर व वेल्हा तालुक्यात आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील लाभार्थ्यांद्वारे वैयक्तिक स्वरूपातील घरकुल बांधण्यास (बीएलसी घटकांतर्गत) २.५ लाखापर्यंत २ हजार ४३६ लाभार्थ्यांना अनुदान दिले जाणार आहे. सार्वजनिक खासगी भागीदारी तत्त्वावर खासगी विकासकाकडून घटक ३ नुसार परवडणा-या घरांची निर्मिती करण्यासाठी ६ विकसकांचा सहभाग मिळाला असून २३ हजार ६८८ घरांची निर्मिती केली जाणार आहे. त्यापैकी १३ हजार ७०३ घरांची निर्मिती शासकीय दराने केली जाणार आहे. त्याचप्रमाणे भागीदारीमधील परवडणा-या घटकांतील घरांसाठी २.५ लाखापर्यंत अनुदान देण्यात येणार आहे. नागरिकांनी अधिक माहितीसाठी तसेच सदर सदनिकांचा लाभ मिळविण्यासाठी www.pmrdapmay.com या
संकेतस्थळावर भेट द्यावी व ९५६१३३८९६२/७२ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.

वाघोली, भावडी, मुळशीत घरे
हवेली तालुक्यातील भावडी येथे १८० ,आर्थिक दृष्ट्या दूर्बल घटकांसाठी वाघोलीत  425 परवडणा-या सदनिका,मुळशी तालुक्यात ७०३  तर लोणीकंदमध्ये १ हजार २७१,महाळुंगे येथे १० हजार ६१३ परवडणा-या सदनिका केल्या जाणार आहेत.माण-महाळुंगे येथे २ हजार ३८७ घरे निर्माण केली जाणार आहेत.

भावडी येथील झेन स्पेस इको टाऊन या बिल्डरच्या २ प्रकल्पात  ७२० सदनिका असून प्रत्येकी किंमत १२ लाख ८७ हजार एवढी आहे .वाघोलीत गुनिना बिल्डरच्या प्रकल्पात ८४० सदनिका असून त्यांची प्र्त्यर्की किंमत १२ लाख २८ हजार एवढी आहे .मुलखेड(मुळशी )दीपार्थ इन्फ्रास्ट्रक्चर यांच्या १२९२ सदनिका असून त्यांची प्रत्येकी किंमत ७ लाख ८४ हजार एवढी आहे.लोणीकंद येथील कोलते हाऊसिंग मधील २४५२ सदनिका असून त्यांची प्रत्येकी किंमत ९ लाख १२ हजार एवढी आहे.म्हाळुंगे येथे पोतदार हबितेत यांच्या १८ हजार ३८४ सदनिका असून त्यांची प्रत्येकी किंमत १८ लाख ७९ हजार एवढी आहे.मान म्हाळुंगे येथे महा हाऊसिंग आणि पीएमआरडीए च्या ६५०३ सदनिका याच किमतीत आहेत

 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

नेस वाडिया कॉलेज, सीओईपी टेक आणि निकमारचे दमदार विजय

लोणी काळभोर : एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ, पुणे...

धनगर, ओबीसी, मराठा, आदिवासी सर्वच समाजाची फसवणूक करून फडणवीसांनी राज्यात जातीय संघर्ष पेटवला

ओबीसी बहुजन पक्ष व काँग्रेसची आघाडी, जिल्हा परिषद, पंचायत...

अमेरिकेच्या धमकीनंतर 7 देशांचे सैनिक ग्रीनलँडमध्ये पोहोचले

अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ग्रीनलँडवर कब्जा करण्याच्या धमक्यांनंतर...